अपहरण मारहाण झालेल्या दोघांची पोलीसांनी केली सुटका
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
मालेगाव :- दि.१७/१०/१/२०२५ मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने एका गंभीर अपहरण मारहाण व जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीतांना अटक करुन ओडिसा राज्यातील दोन नागरिकांची सुटका केली आहे.सदर घटनेबाबत हकीकत अशी की फिर्यादी टीपी प्रसाद राजू,वय २९ वर्ष राहणार पुकाली,जिल्हा कोरापुर,राज्य ओडिसा व त्यांचा मित्र जलंदर पोडाल,हे दि.०९/१०/२०२५ रोजी शिर्डी दर्शनासाठी निघाले असता समाधान निंबा देवरे, राहणार मेहुने तालुका मालेगाव व त्यांचे चार साथीदार यांनी धुळे टोल नाका परिसरातून फिर्यादी व त्यांच्या मित्राचे अपहरण करून मालेगाव येथील हाॅटेलमध्ये डांबून ठेवले दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.सन २०२० मध्ये जबरदस्तीने घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी दबाव आणला यातील आरोपीतांनी फिर्यादी कडून वेळोवेळी ऑनलाइन व्यवहाराद्वारे ४० हजार रुपये तसेच त्यांच्या ताब्यातील KIA कंपनीची CARENS कार क्रमांक OD-10-W-2682 दोन मोबाईल फोन असा एकूण सात लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज बेकायदेशीर पणे काढून घेतला सदर घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ कारवाई सुरू करुन हाॅटेल विशाल कौळाणे मनमाड रोड येथे छापा टाकला फिर्यादी तसेच त्यांच्या मित्राची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.यावेळी आरोपीत समाधान देवरे,त्याचे साथीदार पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच पोलीस पथकाने शिताफीने सर्वांना ताब्यात घेतले आहे.या कारवाईत १)समाधान निंबा देवरे वय ३४ वर्ष व्यवसाय शेती रा.मेहूणे ता मालेगाव जि नाशिक.२)रोशन शिवाजी अहिरे वय २१ ड्रायवर मेहुणे मालेगाव.३)सोमनाथ रविंद्र आहेर वय २२ मेहुणे मालेगाव.४)गणेश गोविंद मेंडायत वय २४ व्यवसाय मजुरी मेहुणे मालेगाव,५)शिवम कैलास पैठणकर,वय २२व्यवसाय मजूरी मेहुणे मालेगाव.यांना अटक केली.याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह रजि.नं.७६९/२०२५ दाखल करण्यात आला आहे.सर्व आरोपीतांना न्यायालयात हजर करत तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग यशवंत बाविस्कर, यांच्या मार्गदर्शनाखाली सुचनाप्रमाणे मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी,उपनिरीक्षक तुषार भदाणे,उपनिरीक्षक दामोदर काळे,पो हवा रतिलाल वाघ, अमोल शिंदे, यांच्या पथकाने केली.याकारवाई मुळे अपहरण,जबरदस्तीने पैसे उकाळणारे टोळीचा पर्दाफाश होऊन दोन नागरिकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Comments
Post a Comment