सकल मराठा परिवार च्या वतीने पूरग्रस्त बीड परिसरात मदतकार्य
नाशिक :- एक हात मदतीचा हा उपक्रम सकल मराठा परिवार नाशिक संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सकल मराठा परिवार पुढे आला असून नाशिक शहर जिल्ह्यातून दानशूर व्यक्तींनी दिलेल्या जीवनावश्यक वस्तू शालेय साहित्य,यांचे किट तयार करून वाटण्यात येत आहे.मुसळधार झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.आपल्याला जगवणारे शेतकरी बांधवांचे शेत,गोठा,गुर ढोर,उभी पिक,घर,या आसमानी संकटात वाहून गेली संसार उघड्यावर पडला आहे.त्याचे अतोनात हाल झाले त्यांचे दुःख आपण वाटून घेऊ शेकत नाही पण त्यावर मदतीची फुंकर घालू शकतो यासाठी शेतकरी बांधवांना आपल्या कडून थोडीशी मदत म्हणून आपला एक हात मदतीचा,कोणाच्या तरी आयुष्यात नवीन उमेद निर्माण करू शकतो.याकरिता सर्व नाशिककरांना मदतीचे आवाहनही सकल मराठा परीवाराच्या वतीने करण्यात येत आहे.या आवाहनास भरघोस प्रतिसादही मिळात आहे.तांदूळ,गव्हाचे पीठ,सर्व प्रकारच्या डाळी,भिस्कीट पुडे,फरसाण,तेल,पोहे,चहा पावडर,साखर,मॅगी ब्लॅंकेट,चादर,टॉवेल,बेडशीट,नवीन साडी मुलांसाठी शालेय दप्तर, वही पेन अशा वस्तू जमा करण्यात आल्या आहेत सर्व वस्तूंचे ३०० कीट करून बीड तालुक्यातील कट चिंचोली,यागावात वाटप करण्यात आले.यावेळी किट वाटप केल्याबद्दल गावाच्या वतीने सरपंच रवी निवारे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सकल मराठा परीवार संस्थेचे आभार व्यक्त केले.
टिप - आपणासही मदत पोहचवायची असल्यास सकल मराठा परीवार समन्वयक नाशिक,खंडू आहेर ९८८१८७९७४९ यांच्याशी संपर्क साधावा
Comments
Post a Comment