त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीने सप्तश्रृंगी आईला साडी चोळी अर्पण
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
सप्तश्रृंगी गड :- श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे शारदीय नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आई श्री सप्तशृंगी मातेला साडी-चोळी अर्पण ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे, गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना (तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि सप्तशृंगी गड) ओटी अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग,आणि विश्वस्त स्वप्निल शेलार,यांनी सपत्नीक आई श्री सप्तशृंगी मातेस हातमागावर विणलेली पैठणी महावस्त्र साडी-चोळी, भरजरी हार,गजरे,मंगळसूत्र,नथ, जोडवे तसेच सवासीन वाण ओटी अर्पण केली.याप्रसंगी शुभ प्रसंगी दोन्ही देवस्थानांचे अधिकारी,कर्मचारी,पुजारीवर्ग तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.त्रंबकेश्देवर वस्थानतर्फे दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमा निमित्त साडी-चोळी अर्पण करण्याची परंपरा आहे.यावर्षीही हा विधी मोठ्या श्रद्धेने व भक्तीमय वातावरणात पार पडला.आई श्री सप्तशृंगी मातेस अर्पण केलेली साडी-चोळी व सवासीन वाण ओटी ही देवस्थानाच्या धार्मिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले.
शारदीय नवरात्र उत्सव २०२५ आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर येथील आई श्री तुळजाभवानी माता, कोल्हापूर येथील आई श्री महालक्ष्मी माता, तसेच माहूर येथील आई श्री रेणुका माता यांना देखील भरजरी हातमागाची पैठणी महावस्त्र साडी-चोळी व ओटी अर्पण करण्यात आली असल्याचे पुरुषोत्तम कडलग, यांनी स्पष्ट केले. या धार्मिक उपक्रमामार्फत राज्यात सुख, समृद्धी, आरोग्य व भाविक कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
Comments
Post a Comment