पोलीसांच्या पथकाने मोबाईल चोरट्याला तात्काळ घातल्या बेड्या
ना.रोड :- फिर्यादी हे दिनांक 2-10-25 नाशिक रोड ते उन्नाव डाऊन पुष्पक एक्सप्रेस ने प्रवास करण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून ट्रेनमध्ये बसत असताना त्यांच्या खिशातील पोको कंपनीचा मोबाईल निळ्या रंगाचा किंमत 11 हजार रुपये असा मुद्दाम लबाडीने चोरी करून नेला म्हणून आज दिनांक 3-10-25 रोजी दुपारी 1:45 वाजता फिर्यादी अमितकुमार श्रीराम विलास वय27वर्ष राहणार साई कृपा हाँटेल,पेट्रोल पंप जवळ नाशिक रोड यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला त्यावरून त्याला नाशिक रोड रेल्वे परिसरात ग्रस्त करीत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील,आरपीएफ आरक्षक मनीष कुमार सिंग, आरपीएफ आरक्षक सागर वर्मा, कृष्णकुमार यादव, यांनी संशयावरून एक संशयित इसमास रेल्वे पार्किंग येथे पकडून त्यास आरपीएफ ऑफिस येथे प्रभारी अधिकारी नवीन सिंग,यांच्या समक्ष हजर केले.त्यावेळेस त्याच्या अंगझडतीत चोरी गेलेल्या वर्णनाचा मोबाईल मिळून आला त्यास मोबाईल बाबत विचारपूस केले असता व मोबाईल चा लॉक ओपन करायला सांगितला असता तो काही एक सांगत नव्हता नंतर त्याने हा मोबाईल दिनाक2-10-25 रोजी पुष्पक एक्सप्रेस मध्ये बसणार्या एका प्रवाशाचा चोरला असल्याचे कबूल केले त्यावरून तपासी अंमलदार संदीप उगले,यांनी चोरी गेलेला मोबाईल व चोराच्या ताब्यात मिळालेल्या मोबाईल चेक केला असता तो वरील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.आरोपीत नामे आवेश नाझीमी माहीमी वर्ष वय ३७ फर्स्ट राबोडी जामा मज्जित जवळ रूम नंबर तीन जिल्हा ठाणे आरोपी यास गुन्हा र न 194/ 25 कलम ३०५ बी एन एस मधील गुन्हयात ताब्यात घेऊन आज रोजी 35 (3) बी एन एस एस नोटीस देऊन दिनांक 4-10-25 रोजी मा. रेल्वे कोर्ट नाशिक रोड.याच्या समक्ष हजर करण्यात येईल हि कारवाई लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी रेल्वे मनमाड, वसंत भोये, एपीआय, नरेंद्र खैरनार, रेल्वे सुरक्षा बल, प्रभारी अधिकारी नवीन सिंग प्रताप सिंग, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील,पोलीस अंमलदार शैलेश पाटील,पोलीस हवालदार राज बच्छाव, आरपीएफ आरक्षक मनीष कुमार सिंग, सागर वर्मा, कृष्णकुमार यादव,यांनी केली
Comments
Post a Comment