अखेर एक बिबट्या जेरबंद
ना.रोड :- परिसरातील चव्हाण मळा,सय्यद मळा येथे आज वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात कैद झाला आहे.यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास सोडला मात्र अजूनही १ बिबट्या चार पिल्ले असल्याची शक्यता आहे.अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. वन विभागाने २ ते ३ पिंजरे याठिकाणी तात्काळ लावावे.उर्वरित बिबट्यांनाही जेरबंद करावे अशी मागणी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गणेश कदम तसेच नागरीकांच्या वतीने करण्यात आली आहे.प्रसंगी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी,उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी परिसरातील मदत करणारे नागरिक तरुण आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment