आ.देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत सांज सुरेल गीतांची मैफील संपन्न
दिपावलीच्या पार्श्वभूमीवर दिपालीनगर येथे सांज सुरेल गीतांचा मैफिल संपन्न
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २३ भाजप चे माजी नगरसेवक यशवंत निकुळे , माजी नगरसेविका रुपाली निकुळे,विनयनगर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने दिपावली सांच मैफिलीचे आयोजन जयप्रकाश छाजेड उद्यान येथे रविवारी (दि१९) सायंकाळी करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली),पार्श्वगायिका कुमारी खुशी भोजक, यांनी कानडा राजा पंढरीचा,चला जेजुरीला जाऊ, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, राधा ही बावरी आदींसह सुप्रसिद्ध भक्तीगीते भजन,हिंदी, मराठी गीते सादर करत रसिक श्रोत्यांची मने गायकांनी जिंकली.त्यांची गायक अर्जुन तांबे, गायिका मिनल धोडपकर,कीबोर्ड अनिल धुमाळ, तबला महेश धोडपकर,ऑक्टोपॅड देवानंद पाटील, प्रतीक पाटील यांनी साथ दिली.याप्रसंगी सूत्रसंचालन सचिन जाधव,यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मध्य नाशिक विधानसभेच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे या उपस्थित होत्या. या ठिकाणी सुसज्ज असे उद्यान उभारले गेले आहे.त्यातच आज पहिल्यांदाच दिपावलीच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला सुरेख अशा सांज मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.अशाच प्रकारची सांज मैफल दरवर्षी या उद्यानामध्ये सुरूच रहावी ही सदिच्छा आमदार सौ देवयानी ताई फरांदे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन करणारे माजी नगरसेवक यशवंत व रुपाली निकुळे यांनी छान प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांचे उपस्थितांनी आभार मानले.आपण सर्वांनी त्यांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून येथून निवडून द्यायचे आहे.आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे आ.फरांदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार,माजी महापौर सतीश कुलकर्णी,माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, संदीप लेंडकर,ऍड श्याम बडोदे,अर्चना थोरात, शाहीन मिर्झा, दिपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे,सुनील फरांदे,योगेश म्हस्के,सुनील खोडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक पंडित नेरे,भास्कर पाटील,संजय जगळे, अरुण पाटील,सचिन गुलाटी,सुरेंद्र कर्पे,साहेबराव सोनवणे,राजेंद्र कदम,छगनराव साळवे,नरेंद्र अहिरे,प्रभाकर उगले,राजेंद्र देसले,परशराम राऊत,बबनराव गीते, दत्तात्रय शिंदे,मधुकर पाटील,धनंजय देसले,निखिल उगले,महिला,पुरुष,लहान थोर सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment