प्रभाग क्रमांक २० येथे सांज पाडवा कार्यक्रम संपन्न नागरिकांचा भरभरून प्रतिसाद
ना रोड :- प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे यांच्या मधुर वाणीने सादर केलेल्या गीतांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले.भावगीतांनी आणि भक्तीगीतांनी नागरिकांची मने जिंकली.यावेळी गणेश उत्सव आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या विजयादशमी उत्सव लकी ड्रॉ विजेत्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत बालगोपालांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात येवून नावे जाहीर करण्यात आली.तसेच विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विजयी स्पर्धकांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात आली.नाशिक रोड विकास मंच संस्थापक गणेश कदम,आणि स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुप्रिया गणेश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “सांज पाडवा स्वर प्रल्हादाचा” या भावगीते आणि भक्तीगीतांच्या कार्यक्रमात प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे,यांनी आपल्या मधुर वाणीने सादर केलेल्या गीतांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
सखे चल ग सखे पंढरीला'' विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत,दोनच राजे इथे गाजले,एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर”तसेच “तुफानातले दिवे” “कव्वाली” यांसह अनेक भावगीते आणि भक्तीगीते सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.उपस्थित नागरिकांनी आपल्या आवडीच्या गाण्यांची मागणी केल्यावर शिंदे,यांनी तीही आपल्या सुरेल आवाजात सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.यावेळी गणेश उत्सव आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या विजयादशमी निमित्त घेण्यात आलेल्या लकी ड्रॉचा सोहळा बालगोपालांच्या हस्ते पार पडला.विजेत्यांची नावे तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांची घोषणा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी विजेत्यांना सोन्याची नथ,पैठणी तसेच स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांना विविध बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाला शिवसेना उपनेते अजय बोरस्ते,महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम, यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोज बेलदार, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर, बालाजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास मुदलियार, रवी पगारे, कपिल शर्मा, माजी नगरसेवक संजय अढांगळे, मयूर मगर, नितीन खर्जुल, नितीन चिडे, प्रदीप बागुल, उदय भालेराव, किरण पगारे, नितीन कुलकर्णी, देशपांडे गुरुजी, पुष्कर कुलकर्णी, कैलास कदम,अमोल पाचोरकर, तुकाराम चव्हाणके, देविदास भावसार, आशिष भोळे,अंकुश कदम, बापु सातपुते,राजू वाघ, गणेश जाधव, महेश जाधव, गणेश पवार,नितीन भालेराव,सोनल अकोले,अमोल जरे,पार्थ कदम, जय कदम, विकास कदम,नाना रिपोर्टे,राहूल साळवे,पल्लवी वाघ, प्रज्ञा साळवे,आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश बच्छाव, निकेश पाटील, प्रसन्न कदम,सिद्धेश विसपुते,अनिल व्यवहारे,कृष्णा उगले,आदित्य कदम,संजय बर्वे, कुणाल पगारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment