बांधकाम कामगार योजनेसाठी महिलांची पायपीट
नाशिक :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध सवलती दिल्या जात आहेत.तसेच संसार उपयोगी साहित्य वाटप कामगार किट करण्यात येते याकरिता बांधकाम कामगार असल्याची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.नाशिक शहर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिलांनीही बांधकाम कामगार योजेनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले आहे.मात्र सहा सहा महिने एक एक वर्ष कामगार कार्ड वितरीत होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.नाशिक येथील महाराष्ट्र शासन कामगार उपआयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होत आहे.सदरच्या योजनेचा लाभ तात्काळ मिळण्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयाने कार्यवाही करावी.योग्य लाभार्थींना लाभ मिळावी अशी मागणी महिला वर्गातून नागरिकांमधून होत आहे.
Comments
Post a Comment