ब्रह्माकुमारी संस्थेच्या मेरी म्हसरूळ सेवा केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
ब्रह्माकुमारी संस्थेचा विस्तार चहुबाजूने झालेला - खासदार डॉ. शोभाताई बच्छाव
सरकारचे व्यवस्थापन ब्रह्माकुमारी संस्थेच्या हातात द्यावे सतीश शुक्ल
मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे विशेष कार्य होत आहे - अँड नितीन ठाकरे
नाशिक :- म्हसरूळ येथील ब्रह्माकुमारी संस्थेचे उपक्षेत्रीय कार्यालय प्रभू प्रसाद चा 17 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ब्रह्माकुमारी संस्थेच्या तत्कालीन मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी जानकी दादी जी यांच्या शुभहस्ते या मुख्य सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले होते. ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रिय संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. शोभाताई बच्छाव,मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे,अखिल भारतीय पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष सतीश शुक्ल, दैनिक महासागर चे संपादक प्रा.जयंत महाजन, छावा भारत मिशन चे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पांगारकर, दैनिक प्रहार चे मुख्य वार्ताहर धनंजय बोडके, साप्ताहिक आपला आवाज चे संपादक अमोल सोनवणे, आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली याप्रसंगी स्वागत नृत्य कुमारी सादगी हिने केले.अध्यक्ष संबोधनात ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी विजयादशमीचे आध्यात्मिक रहस्य सांगितले. यात दीदींनी सांगितले की भारतीय संस्कृतीत विजयादशमी किंवा दसरा हा सण चांगल्या चा वाईटावर विजयाचा संदेश देतो. आज काम क्रोध लोभ मोह अहंकार रुपी रावणाचा सर्वत्र प्रभाव दिसतो आहे. शास्त्रात वर्णन केलेली रावणाची लंका ही चाहू बाजूने पाण्याने वेढलेली अशी होती. आजही त्याच प्रकारचे चित्र दिसत आहे. आज विश्वामध्ये 71 टक्के पाणी व 29 टक्के जमीन आहे ही गोष्ट अधोरेखित करते की हे एक प्रकारे रावणराज्यच आहे. रावणाच्या अधिपत्याखाली पाचही तत्व होती. आज बघितले तर माणसाने या सर्व पंचमहाभूतांवर आपले वचस्व प्रस्थापित केल्याचे वाटते. जसे की नळ उघडला की जलदेवता येते. गॅस पेटवला की अग्नीदेवता प्रगट होते, फॅन चे बटन दाबले तर वायुदाता अवतरतात , यावरून रावणाच्या हातात जसे सर्व पाच तत्व होते असे मानतात, त्याच प्रकारे आजही मनुष्याच्या हातात ही पाच तत्व आल्यासारखे वाटतात. तिसरी महत्वाची ओळख म्हणजे सोने की लंका. रावणाची लंका सोन्याची होती. मात्र असे जाणवते की ती लंका सोन्याची म्हणजेच गोल्ड किंवा सुवर्णाची नसून ती लंका (हिंदीत) सोने की अर्थात अज्ञान निद्रेमध्ये झोपलेल्यांची आहे. आजही सृष्टीतील मानव अज्ञानाच्या निर्देश झोपलेला आहे. ही निद्राच खरी सोने की लंका आहे. बाहेरून सोनेरी भासणारे हे जग आतून विकारांच्या अंधाराने झाकलेले आहे.आज या रावण राज्यातून मुक्त करण्यासाठी स्वयं निराकार परमपिता परमात्मा शिव या धर्तीवर अवतरले आहेत. आज सर्वत्र धर्मांचा ऱ्हास झालेला दिसतो. आज ची परिस्थिती यालाच अधोरेखित करते की हीच ती कलियुगाची अंतिम घटिका आहे की जेव्हा स्वयं निराकार शिव परमात्मा या धर्तीवर अवतरीत होतात. आपणही परमात्म्याच्या या खऱ्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठीसाठी ब्रह्माकुमारी संस्थेच्या कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन याविषयी निशुल्क साप्ताहिक कोर्स करू शकतात असे आवाहन दीदींजीनी दसऱ्याच्या शुभ संदेशातून केले.खासदार शोभाताई बच्छाव यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देत मत व्यक्त केले की ब्रह्माकुमारी संस्थेच्या सानिध्यात आपला पूर्ण परिवार आलेला असून संस्थेतर्फे शिकवण्यात आलेल्या राजयोगाचे आम्हाला वेळोवेळी खूप मदत होत असते. या अध्यात्मिक जागृतीने आम्ही आमचे दैनंदिन जीवन कार्य करत असतो. ब्रह्माकुमारी संस्थेचा विस्तार हा चहुबाजूने झालेला तर आहेच पण या विस्तारांसोबतच आपला आध्यात्मिक विस्तार सुद्धा याच पद्धतीने वाढत रहावा अशा शुभेच्छा वर्धापन दिनानिमित्त शोभाताई बच्छाव यांनी व्यक्त केल्या.
एडवोकेट नितीन भाऊ ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत सांगितले की 2008 सालापासून ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे या ठिकाणी जे कार्य चालू आहे ते अतिशय अभिमानास्पद आहे.ब्रह्माकुमारी संस्थेच्या अशा अनेक सेवा केंद्रांमधून अतिशय महान कार्य चालत आहे. अध्यात्मिक विचार पसरवण्याचे खूप मोठ्या प्रमाणात कार्य या संस्थेमार्फत होत आहे . समाजात प्रेम सौहार्द आपुलकीची भावना कशी निर्माण होईल याची शिकवण या संस्थेमध्ये दिली जाते. मानव जातीला शांतता व सुख कसे मिळेल यासाठीचे कार्य या संस्थेमार्फत होत आहे. आज लोकांकडे पैसा आहे संपत्ती आहे मात्र सुख शांती नाही. सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास झालेला दिसतो. येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण कसे चांगले वातावरण देऊ? हे विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आज हवा पाणी सर्व प्रदूषित होत आहे आणि हे असेच चालू राहिले तर पुढच्या पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. यावर उपाय म्हणून ठाकरे यांनी पुढे सांगितले की शरीर आणि मन हे स्वस्त असले तर आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणि संपन्नता प्राप्त होते. शरीर तर आपण स्वस्त ठेवू शकतो मात्र मनाला स्वस्त ठेवण्यासाठी ब्रह्माकुमारी सारख्या संस्थान कडून विशेष कार्य होत आहे. ब्रह्माकुमारी संस्थेचे राज योगाचे शिक्षण सर्वांनी अंगीकरायला हवे असे प्रतिपादन ठाकरे यांनी याप्रसंगी केले प्राध्यापक जयंत महाजन यांनी सांगितले की एक वेळेस कार्यालयीन कामासाठी राजस्थान येथील पोखरण येथे जात असताना वाटेत ड्रायव्हरला फ्रेश होण्यासाठी वेळ हवा होता म्हणून आम्ही गाडी थांबवली तर त्याच वेळेस लक्षात आले की हे माउंट आबू आहे आणि ड्रायव्हरला त्याच्या कामासाठी मोकळे सोडून मी परिसर बघण्यासाठी पायी निघालो तर अनायासपणे मी ब्रह्माकुमारी संस्थेत पोहोचलो या ठिकाणाचे वातावरण बघून मी भारावून गेलो व तब्बल पाच तास त्या ठिकाणी माझे मी व्यतीत केले. आज बातम्या करत असताना समाजातून जे येते ते लिखाण करावे लागते समाजा वाईट परिस्थितीतून जात आहे. दररोजच्या भयंकर घटना व त्यांचे वार्तांकन करून मन सुन्न होऊन जाते. अशा परिस्थितीत ब्रम्हाकुमारी संस्थेच्या या वातावरणात आल्यानंतर मन प्रसन्न व शांत होते अशा अध्यात्मिक कार्याची आज गरज असल्याचे प्राध्यापक महाजन यांनी याप्रसंगी नमूद केले सतीश शुक्ला,यांनी सांगितले की ब्रह्माकुमारी संस्था माझ्यासाठी एक कुटुंब आहे. ज्या प्रकारे माझ्या कुटुंबात राहून मला आनंद प्राप्त होतो त्या प्रकारे ब्रह्माकुमारी संस्थेत मला आपुलकी प्रेम जिव्हाळा मिळतो . म्हणून मी या कुटुंबाचा एक घटक आहे याची जाणीव मला येथे होते. माउंट आबू येथील आपले अनुभव व्यक्त करताना शुक्ला यांनी सांगितले की राष्ट्रपती पंतप्रधान सारखे अनेक महान व्यक्ती या संस्थेच्या व्यासपीठावर येतात व आपल्यामध्ये अध्यात्मिक जागृती करून जातात. या संस्थेचे व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे माझ्या मते सरकार चालवण्याची मॅनेजमेंट या संस्थेला दिले तर नक्कीच समाज प्रगत होईल असे मला वाटते. मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजतो की या संस्थेच्या संपर्कात मी आहे.कार्यक्रमात इतर ही मान्यवरांनी आपले मनोगत प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी तर स्वागत ब्रह्माकुमारी ज्योती दीदी व मंगल दीदी यांनी केले.सुस्वागत नृत्य कुमारी सादगी हिने केले. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी संस्थेचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांना आदरणीय ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment