गडावर नवरात्र उत्सव दसरा निमित्त बोकड बळी सोहळा संपन्न
(प्रतिनिधी विजय चव्हाण)
सप्तश्रृंगी गड :- नवरात्र उत्सव दसऱ्यानिमित्त सप्तशृंगी गडावर मारुती मंदिरापासून ते श्री म्हसोबा मंदिर पहिल्या पायरी पर्यंत बोकड बळी देण्यासाठी बोकड सह मिरवणूक मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती.यावेळी म्हसोबा महाराजांची पूजा अभिषेक करण्यात आला.बोकडची पूजा सप्तशृंगी देवी ट्रस्टचे दहातोंडे, व सरपंच, पोलीस पाटील, यांनी हस्ते अभिषेक पूजा केली दसरा समितीचे पाच सदस्य बोकड घेऊन बळी देण्यासाठी सप्तशृंगी देवी मंदिराकडे रवाना करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी कळवणचे तहसीलदार सर्कल पगारे, तलाठी भाऊसाहेब, वाघिरे तात्या, गावचे पोलीस पाटील,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य पोलीस उपनिरीक्षक पाटोळे, समाजसेवक शिवभक्त विजय चव्हाण, बेनके साहेब,राजेंद्र वाघ, कैलास वाघ, ग्रामस्थ ट्रस्टचे सदस्य कर्मचारी व ब्रह्मवृंद यांच्यासह उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment