नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने आपत्तीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत
मुंबई :- सामाजिक उत्तरदायित्व निधी ५ लक्ष रुपये नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सुपूर्द,यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि पशुधनाचे अपरिमित नुकसान झालेले आहे.या अतिवृष्टीकाळात पोलीस विभागानेही नाशिक ग्रामीण भागात अहोरात्र जागृत राहत आपले कर्तव्य पार पाडलेले आहे.यासंकट काळात शेतकरी बांधवांना मदत व्हावी या सामाजिक जानविणे व कृतज्ञता म्हणून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या संयुक्त वर्गणीतून संकलित केलेल्या सामाजिक उत्तरदायित्व निधी ५ लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्या कडे सुपुर्द केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे कौतुक केले आहे.
Comments
Post a Comment