कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय सभासदांच्या हिताचे ॲड. नितीन ठाकरे


नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

नाशिक :- नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्थेचे कार्य खरोखरच खूप कौतुकास्पद असून, सभासदांचे हित जोपासण्यासाठी कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय खूपच स्वागतार्ह आहेत. यातून पतसंस्थेची अजून भरभराट झाल्यावाचून राहणार नाही, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस आणि कॉलेज टीचर्स पतसंस्थेचे पदसिद्ध संचालक ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेच्या 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते. मराठा हायस्कूल परिसरातील कै. तुकाराम रौंदळ सभागृहात सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी व्यासपीठावर मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,चिटणीस दिलीप दळवी,संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड, रमेश पिंगळे, ॲड. लक्ष्मण लांडगे, ॲड. संदीप गुळवे,प्रवीण जाधव, विजय पगार, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. अजित मोरे, डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, डॉ.के. एस.शिंदे,उपस्थित होते.यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर,यांनी पतसंस्थेच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले.नवनिर्वाचित अध्यक्ष प्राचार्य डॉ. महेश वाघ,यांनी त्यांच्या प्रास्तविकातून संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. मानद सचिव डॉ. अशोक बोडके यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व स्वागतपर मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी सव्वा सहा टक्के लाभांश देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. संस्थेच्या कार्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त करून कार्यकारी मंडळाचे कौतुक केले. 
सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना कार्यकारी मंडळाचे नेते प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी सविस्तर उत्तरे देऊन सर्व सभासदांचे समाधान केले. संस्थेचा राखीव निधी दहा टक्के करावा, या सभासदांच्या मागणीला उत्तर देताना प्रा.आर.के.पाटील यांनी कायद्याचा आधार घेऊन त्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी गुणवंत सभासदांच्या पाल्यांचा व सेवानिवृत्त सेवकांचा यथोचित सत्कार ॲड.नितीन ठाकरे व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.डॉ बोडके यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा शब्द सुमनांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. संचालक डॉ. राजेंद्र घोलप यांनी सत्कारार्थी यांच्या नावांचे वाचन केले.अध्यक्ष डॉ.महेश वाघ,उपाध्यक्ष मोहन धारराव, मानद चिटणीस डॉ.अशोक बोडके, संचालक प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्रा. आर. के. पाटील, प्रा. वैशाली कोकाटे, ज्ञानेश्वर सोनवणे, डॉ. जितेंद्र कोडिलकर, प्रा. डॉ.राजेंद्र घोलप,संतोष मोगल,कैलास बोरस्ते, बाळासाहेब टर्ले, प्रा.अण्णा टर्ले, प्रा.नंदकुमार काळे, अविनाश कदम, अशोक बाजारे, स्वीकृत संचालक महेंद्र चव्हाण, डॉ. भारती कोल्हे, प्रा.दिनेश हळदे,यांनी सभेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.डॉ.तुषार चांदवडकर,यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष मोहन धारराव,यांनी आभार मानले.कार्यकारी मंडळ करणार शासनाकडे पाठपुरावा यावेळी वेतनानुसार कर्ज मर्यादा वाढविणे,विनाअनुदानित सभासदांच्या कर्ज वाटप रक्कम वाढविणे, सभासद कल्याण निधी कपात कमी करणे, राखीव निधी कपात 25 वरून 10 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणे, आदी मागण्या करण्यात आल्या. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन कार्यकारी मंडळाकडून देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन