अभोणा कनाशी गुजरात रस्त्याची चाळण तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

अभोणा कनाशी गुजरात रोडची चाळण विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे
चाळण झालेला रस्ता भगदाड पडलेला पुल वाहनधारकांना दाखवत आहे दवाखान्याची वाट
(प्रतिनिधी - विजय चव्हाण)
कळवण :-अभोणा कनाशी गुजरात रस्त्याची चाळण झाली असून खड्डेच खड्डे झाले आहेत अभोणा गिरणा नदीवरील पुलावरही उत्तर बाजूस खड्डा पडून सिमेंट काॅक्रींट मोकळे झाले आहे.मोठ्या प्रमाणावर सतत रहदारी असलेल्या पुलावर खड्डे पडल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याभागात कांदा मार्केट जवळच असल्याने अवजड वाहनांच्या अपघात होऊन अनर्थ घडल्यास त्याला संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असतील धोकादायक झालेल्या रस्त्याची व पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी नवीन रस्ता पुल करण्यात यावा अशी मागणी वाहनधारक नागरिक करीत आहेत.चाळण झालेल्या यारस्त्याच्या,पुलाचे काम तातडीने करण्याची मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास कळवण तालुका,आभोणा गोसराणे,कनाशी, ग्रामस्थांनी केली आहे.बांधकाम उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर उपोषण, रास्तारोको आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन