चाकूचा धाक दाखवून लूटमार जबरी चोरी तसेच दुकान फोडणारा असे दोघे ताब्यात मुद्देमाल हस्तगत

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक  :- महामार्गावरील ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारा संशयित आरोपीत ताब्यात,जायखेड्यात दुकान फोडणारा मालेगावातून अटक नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील नाउघड माला विरूध्दचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे.आदेशानुसार वाडीवर्हे,व जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांत आरोपीतांना अटक करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.यामध्ये ईगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारा ताब्यात घेण्यात आला आहे.दि.०५/०८/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास दोन मोटरसायकलवर आलेल्या चार आरोपी यांनी संगनमताने मुंबई आग्रा महामार्गावर टाके शिवारात समांतर रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकमधील चालक,क्लिनर यांना चाकुचा धाक दाखवून मारहाण शिवीगाळ करून मोबाईल रोख रक्कम असा २५ हजार किमतीचा मुद्देमाल रोख लंपास केली होती.सदर प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं१७२/२०२५ भा न्या स ३०९,(४)११५,३५२,३,(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदरील गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीच्या आधारे सचीन नामदेव घाणे, राहणार बाराशिंगवे ता इगतपुरी नाशिक याला शिताफीने ताब्यात घेत बोलते केले आहे.त्याच्याकडून लुटमार केलेला मोबाईल फोन रोख रक्कम जप्त करण्यात आली. दुसऱ्या घटनेतील जायखेडा दुकान फोडणारा आरोपीतास मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे.

दि.०४/१०/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास नामपूर सारदे रोडवरील फिर्यादी यांचे ए वन इंन्टोरीअल नावाचं दुकानाचे कुलुप तोडून शटर वर करत दुकानाच्या गल्लयातील रोख रक्कम एक लाख ८२ हजार चोरी झाले होते याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं ३४०/२०२५ भा न्या स.कलम. ३३१ (४)३०५  (अ) गुन्हा दाखल होता.सरद गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव शहरातून संशयित आरोपीत यासिन अख्तर मुस्तकीम अहमद वय २४ राहणार मोलाना उमरेड चौक आदम नगर मालेगाव याला ताब्यात घेतले आहे.सदर आरोपीताने त्याचा साथीदार सिद्दिक व अजून एक यांच्यासह जायखेड्यात गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.त्याला जायखेडा पोलीसांनी तपासा कामी ताब्यात घेतले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील.अप्पर पोलीस अदीत्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर,वाडीवर्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता गंभीरे, पोलिसांमलदार संतोष दोंदे,प्रवीण काकड, सुभाष चोपडा,दत्ता माळी, शरद मोगल,योगेश पाटील, नवनाथ शिरोळे,हेमंत गिलबिले,संदीप बळीराम, मयूर कांगणे,यांच्या पथकाने वरील कामगिरी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन