नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान प्रवाशांना लुटणारे तीन रिक्षाचालक ताब्यात
नाशिक :- शहरातून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना लक्ष्य करून जबरी चोरी करणारे ३ रिक्षाचालक जेरबंद.प्रवाशांकडून मोबाईल,रोख रक्कम व सोन्याची बाळी लुटली होती.पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे मेळा स्टँड परिसरातून तिघे संशयित आरोपीतांना अटक केली आहे.त्यांच्याकडून रु१,८८,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-१ घ्या पथकातील पोलीस निरीक्षक डॉ.अंचल मुदगल,आणि पोउपनि चेतन श्रीवंत,अंमलदार संदिप भांड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड, विशाल देवरे, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी,नाझीमखान पठाण,शर्मिला कोकणी,मुक्तार शेख,अमोल कोष्टी,अनुजा येलवे,मनिषा सरोदे यांच्या पथकाने ही विशेष कामगिरी केली आहे.
Comments
Post a Comment