पोलीसांनी लाखोंच्या दागिन्यांसह चोरट्याला घेतले ताब्यात

ना रोड :- रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलीस नाशिक रोड यांची संयुक्त कारवाई रेल्वेतुन चोरीस गेलेले 56,68,650 रू. चे सोन्याचे दागिने आरोपीत कडुन रेल्वे पोलीसांनी केले. जप्त.फिर्यादी नामे प्रदिपकुमार धर्मपाल सिंह रा. भालेश्वर बिल्डींग, रामवाडी भाजी गल्ली,दादर इस्ट मुंबई हे दि. 10.10.2025 रोजी 00.25 वा. दरम्यान गाडी नं. 12809 डा. हावडा मेल कोच नं. एस/4 बर्थ नं. 41 वरून प्रवास करीत असतांना त्यांची एक काळया रंगाची बॅग त्यात आत 56,68,650 रू. चे सोन्याचे असे होते व ते कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे झोपेचा फायदा घेवुन चोरून नेले बाबत फिर्यादी यांनी पोलीसांना कळविल्याने घटनेचे गांभिर्य घेवुन गाडीत शोध घेण्यात आला एक संशयीत इसम राधे गज्जु बिसोने,वय 30 वर्श रा. मु.गाडगोहन पोस्ट चांदुर थाना झल्लार ता.भैंसदेही जि.बैतूल राज्य मध्यप्रदेश असा मिळून आला. त्याचे कडे दोन बॅग असल्याने  विचारपुस केली असता उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने बॅग चेक करण्यात आली यावेळी फिर्यादी यांचे चोरीस गेलेेले सोन्याचे दागिने मिळुन आले.फिर्यादी यांनी त्याचे विरूद्ध लेखी तक्रार दिल्याने रेल्वे पोलीस ठाणे नाशिकरोड रेल्वे येथे गु.र.नं. 201/2025 कलम 305 (सी) बी.एन.एस. प्रमाणे दि.10.10.2025 रोजी 20.13 वा. गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयात त्याच्या कडुन सोन्याचे दागिने जप्त करून अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये,यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस ठाणे नाशिकरोड प्रभारी अधिकारी स.पो.नि.सचिन बनकर, RPF निरीक्षक नवीन प्रताप सिंह,सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, ASI 340 धनंजय नाईक, पोलीस हवालदार 520 शैलेंद्र पाटील, 217 राज बच्छाव, व रेल्वे सुरक्षाबल नाशिक रोड येथील PSI अंबिका यादव, HC मच्छिंद्र लांडगे, गौतम बिऱ्हाडे, सुनील गडाख, आर पी एफ आरक्षक, सागर वर्मा, मनिष कुमार, के.के.यादव,यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन