पोलीसांची मोठी कारवाई गावठी दारू अड्डे उध्वस्त सोळा इसमावर कारवाई लाखोंचा साठा नष्ठ
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- गावठी दारू निर्माण करणारे अड्डे नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले उद्ध्वस्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू,यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४/१०/२०२५ रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत तसेच वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत चोरुन लपून चालविण्यात येणाऱ्या गावठी दारू हातभट्टी धंद्यावर मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकून वडनेर खाकुर्डी,हद्दीतील अंगण,वडेल,सिंधबन वडेल,वडनेर,खाकुर्डी,काष्टी,रावळगाव,गाळणे,आदी भागात १७ ठिकाणी कारवाई करण्यात आली अंदाजे ९ हजार दोनशे लिटर गावठी दारू रसायन,तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.अकरा इसमांना ताब्यात घेण्यात आले.दुसरी कारवाई मालेगाव तालुका हद्दीत बंधारपाडे पाटणे,चिंचवड,पाटणे,येसगाव,गिलाणे,आदी ठिकाणी ११ ठिकाणी छापे टाकले त्यामध्ये सात हजार सहाशे लिटर गावठी दारू हातभट्टी रसायन तीन लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आले आहे.पाच इसम ताब्यात घेण्यात आले आहेत.सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे,पोलीस अंमलदार सचीन बेदाडे, दिनेश शेरावते,अक्षय चौधरी,राकेश जाधव,राम निसाळ, प्रशांत बागुल, निवृत्ती काळे यांनी केली.
Comments
Post a Comment