पोलिस ठाण्यावर दगडफेक प्रकरणी १४ संशयित ताब्यात
धिंड काढत नेले न्यायालयात, तीन दिवसांची पोलिस कोठडी
कळवण :- कळवण पोलिस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या १४ संशयितांना पोलिसांनी शनिवारी (दि. ११) ताब्यात घेतले. धिंड काढत त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणातील अनेक संशयित अद्याप फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिली.बेपत्ता शेतमजूराच्या शोधासाठी नातेवाईक व समाज बांधवांनी मागील आठवड्यात पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडत अपहरण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस ठाण्यावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे शेतमजूराच्या शोधार्थ पोलिसांनी पाच पथके तयार केली. यावेळी बेपत्ता असलेल्या मजूरास पोलिसांनी त्यांच्या घरातूनच ताब्यात घेत घडामोडींवर पडदा टाकला होता. आता कळवण पोलिसांनी दगडफेक व तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शनिवारी १४ जणांना ताब्यात घेत त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच न्यायालयाने सशयितांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यात बाळू माळी, बापू जाधव, विकास सोनवणे, सचिन वाघ, गणेश सूर्यवंशी, करण पवार, सचिन पवार, सागर शिंदे, नितीन बागूल, कृष्णा पवार, सुनील जाधव, योगेश जाधव, सागर जाधव,कैलास सोनवणे,आदी संशयितांचा समावेश आहे.
उपविभागीय पोलिस अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर,यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी ही कारवाई केली.पुढील तपास पोलिस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्यासह कर्मचारी करीत आहेत.
Comments
Post a Comment