टवाळखोर गल्ली भाई दादा दहशत माजवत असेल तर एक व्हाट्सअप मॅसेज
नाशिक :- नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले आहे की शहरात कोणीही टवाळखोर भाई दादा बाॅस सरकार नाही जर कोणीही धमकावत असेल,दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर नाशिक शहर पोलीस आयुक्त व्हाट्सअप क्रमांकावर 9923323311 दहशत निर्माण करणाऱ्यांचे विडीओ,फोटो, माहिती व्हाट्सअप करावी नाशिक शहर पोलीसांच्या वतीने योग्य तो बंदोबस्त केला जाईल.तक्रारदाराचे नाव ओळख गुप्त ठेवले जाईल.याबाबत विश्वास बाळगावा नाशिक शहराला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीं विरोधात कारवाई सुरुच राहणार आहे.
Comments
Post a Comment