अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर उमटली आनंदाची झळाळी
सिन्नर :- ठाणगाव येथील समर्थ सावली बाल संगोपन केंद्रात सकल मराठा परिवार तर्फे सामजिक बांधिलकी जपत दीपावली साजरी करण्यात आली. या उपक्रमात मुलांना फक्त वस्तू नव्हे तर आपुलकीचा आणि प्रेमाचा स्पर्श देण्यात आला. दिवाळीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलताना पाहून सर्व उपस्थित सदस्य भारावून गेले.तसेच सकल मराठा परिवाराच्या सदस्यांनी आश्रमातील मुलानं बरोबर काही वेळ घालून त्यांच्या बरोबर अल्पोहार करत त्यांच्या शी हितगुज केले.त्यांच्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला.माता पित्यापासून दूर असलेल्या पाखरांना मायेचा ओलावा देण्यात आपला खारीचा वाटा असावा असे मत सकल मराठा परिवार चे आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो असे मत सगळ्या परिवाराने मांडले.याकार्यक्रमाचे आयोजन डॉ.विकास मेदगे,समाधान दळवी, दीपक कोरडे,महेश मुरकुटे,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास सकल मराठा परिवारचे अनेक सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी दत्ता काळे,यांनी आपले विचार मांडले तसेच खंडू आहेर,यांनी सर्वांचे आभार मानले.अनाथ आश्रमाचे संचालक जयराम शिंदे,यांनी आपल्या आश्रमाची महिति देत सकल मराठा परिवाराचे आभार मानले.कार्यक्रमानंतर मुलांना दिवाळी फराळ, शालेय वस्तू, गोडधोड तसेच आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा