भाजपा उत्तर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक संपन्न



 (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- दि.१०/१०/२०२५ नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्ष  रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत 'भाजपा - उत्तर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक' पार पडली.सदर बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षाची संघटनात्मक रचना, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक नियोजन या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच, आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद, मतदारसंघनिहाय नियोजन, संघटनात्मक बळकटी यावर विशेष भर देण्यात आला. पक्षाच्या प्रत्येक पातळीवरील समन्वयातून एकजुटीच्या बळावर यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.याबैठकीत झालेला विचारविनिमय आणि मार्गदर्शन हे उत्तर महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिशा ठरवणारे ठरेल. या बैठकीस महसूलमंत्री महसूल चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पणनमंत्री जयकुमार रावल,वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे,नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार,आ.देवयानी फरांदे आ.सीमा हिरे आ.राहुल ढिकले,यांच्यासह उत्तर महाराष्ट्र विभागातील आमदार,पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन