त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधील१ कोटी ११ लाख रुपयांची मदत
नाशिक, दि. २५ :- त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द करण्यात आला.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे अध्यक्ष कैलास घुले, सचिव तथा मुख्याधिकारी राहुल पाटील,लक्ष्मण सावजी, विश्वस्त रुपाली भुतडा,पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार,मनोज थेटे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर, लेखापाल प्रणव पिंगळे आदी उपस्थित होते.निवृत्त बँक अधिकारी दाम्पत्याची १० लाख रुपयांची मदत तत्पूर्वी महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात नाशिकमधील निवृत्त बँक अधिकारी माणिक विलास घुले, विलास कांतानाथ घुले,या निवृत्त दाम्पत्याने १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिला. तसेच रेखाश्री नागरी सहकारी महिला पतसंस्थेच्यावतीने तज्ञ संचालिका रुपाली परेश कोठावदे,यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश,आर. के. ट्रेडिंगचे संचालक श्रीधर रामचंद्र कोठावदे (सटाणा जि. नाशिक) यांनी ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्याकडे सुपूर्द केला.
Comments
Post a Comment