बागलाण तालुक्यातील बिजोसरे गावातील गावकऱ्यांना बिबट्याचे दर्शन परिसरात

बागलाण बिजोसरे गाव परिसरात बिबट्याचे दर्शन परिसरात भितीचे वातावरण विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे
बागलाण  :- नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोरसे या गावामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून या बिबट्यापासून नागरिकांच्या जीवाला तसेच शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करावे असे आवाहन नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर संघटक वैभवराज शिवाजी रौंदळ यांनी केले आहे. दि.02/10/2025 रोजी तसेच 03/19/2025 रात्री बागलाण तालुक्यातील बिजोरसे या गावामध्ये गावच्या जुनी माळी जवळ बिबट्यांचे गावकऱ्यांना दर्शन झाले आहेत.सदरचा बिबट्या हा अतिशय आक्रमक असून त्याच्या डरकाळीने परिसरामध्ये भतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याच भागातून शिक्षणासाठी लहान मुले शेतकरी शेतीच्या कामासाठी,सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ असते त्याचप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांच्या दारात असलेल्या पशुधन,नागरीकांना बिबट्यापासून भीती निर्माण झाली असून वित्तहानी,जीवित हानी होण्याअगोदरच वनविभागाने तातडीने या बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर संघटक वैभवराज शिवाजी रौंदळ, गावातील नागरीकांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन