Posts

Showing posts from September, 2025

सकल मराठा परिवार संस्था धावणार पूरग्रस्तांच्या मदतीला

Image
नाशिक :- एक हात मदतीचा हा उपक्रम घेऊन सकल मराठा परिवार नाशिक,संस्था मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावणार आहे.सतत चालू असलेल्या पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.?आपल्याला जगवणारा शेतकरी,त्याचं कुटुंब, शेत,गोठा,गुर ढोर,उभी पिक,घर,आसमानी संकटात वाहून गेली आहेत.त्यासाठी त्यांना आपल्या कडून थोडीशी मदत म्हणून आपला एक हात मदतीचा, कोणाच्या तरी आयुष्यात नवीन उमेद निर्माण करू शकतो.यासाठी सर्व नाशिककरांना विनंती आहे की, कृपया या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपला सहयोग द्यावा असे आवाहन सकल मराठा परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे. आपण काय मदत देऊ शकता तांदूळ ,गव्हाचे पीठ,सर्व प्रकारच्या डाळी,भिस्कीट पुडे, फरसाण,तेल,पोहे,चहा पावडर,साखर,मॅगी ब्लॅंकेट,चादर,टॉवेल,बेडशीट साडी असे चांगले खाद्यपदार्थ कपडे फक्त नवीन स्वीकारले जातील तसेच मुलांसाठी शालेय दप्तर, वही पेन अशा वस्तू देऊ शकता. संपर्क व वस्तू जमा करण्याचे ठिकाण- खंडू श्रीराम आहेर - ९८८१८७९७४९ पत्ता :- फ्लॅट नं १,श्री गणेश अपार्टमेंट,हनुमान मंदिर समोर,वाढणे कॉलनी,म्हसरूळ नाशिक, Location :- https://maps.app.goo.gl/uQCW1MQ5...

नवीमुंबई येथील हरवलेली मुलगी रेल्वे पोलीसांच्या मदतीने आई वडिलांच्या ताब्यात

Image
ना.रोड :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मुंबई येथुन अपनयन झालेल्या मुलीचा लोहमार्ग पोलीसांनी शोध घेवुन पोलीस आई वडीलांचे ताब्यात दिले.याबाबत गोपीनाथ आनंद बाईत,रा.ऐरोली,नवी मुंबई यांची मुलगी कस्तुरी वय 16 वर्ष ही दि. २७/०९/२०२५ रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास तिच्या मैत्रीणीकडे जाते असे सांगुन गेली व परत न आल्याने तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन अपहरण केले.म्हणुन रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे तक्रार दिल्याने गु.र.नं.७१३/२०२५ कलम १३७(२) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर अपनयन झालेली मुलगी ही रेल्वे स्टेशन नाशिकरोड येथे असल्याबाबत रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे नाशिकरोड येथे कळविले होते. लोहमार्ग पोलीस स्टेशन नाशिक रोड येथील सहाय्यक फौजदार 69 संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील व पो.हवा. 217 राज बच्छाव यांनी हद्दीत शोध घेता कस्तुरी वय 16 वर्ष ही वेटींग रूम मध्ये बसलेली दिसुन आली.तिला ताब्यात घेवुन रेल्वे पोलीस ठाणे ना.रोड आणुन हजर करत रबाळे पोलीस ठाणे  तिच्या आईवडील यांना फोनद्वारे माहिती दिली. रबाळे पोलीस ठाणे महिला पोलीस हवालदार ब.नं 1401 सपकाळ व...

द्वारका नाशिक येथिल टेंबलाई मातेचा परंपरागत उत्सव साजरा

Image
नवरात्रोत्सवातील पाचव्या माळेला महालक्ष्मी देवी त्रंबोली (टेंबलाई) देवीच्या भेटीला - भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग नाशिक :- नवरात्रोत्सवात विविध धार्मिक परंपरांना विशेष महत्त्व असते. त्यातीलच एक ऐतिहासिक परंपरा म्हणजे महालक्ष्मी देवीची त्रंबोली (टेंबलाई) देवीला भेट देण्याची परंपरा आहे.यंदाही नाशिकमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळली गेली.आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कोल्हासुरू नावाचा राक्षसाचा वध टेंबलाई देवीने केला.विजय मिळाल्यानंतर महालक्ष्मी देवीने उत्सव साजरा केला परंतु टेंबलाई देवीला आमंत्रण द्यायचे विसरली.त्यामुळे रुसून टेंबलाई देवी डोंगरावर गेली.त्यानंतर महालक्ष्मी देवी दरवर्षी आपल्या बहिणीचा रुसवा काढण्यासाठी तिच्या दर्शनाला जाते.त्याच स्मरणार्थ नवरात्रीच्या पाचव्या माळेला ही परंपरा आजही अखंड सुरू आहे.गेल्या अकरा वर्षांपासून हा सोहळा संपन्न होत आहे.यावर्षीही महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोहर बागूल, कुटुंबीयांनी १२५ वर्ष जुन्या श्री टेंबलाई माता मंदिरास भेट दिली.पालखीत बसून, ढोल-ताशांच्या गजरात महालक्ष्मी देवी भेटीसाठी मंदिरात आणण्यात आली.आरती करण्यात आली आणि कोहळा कापून...

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि १४० वा वर्षपूर्ती सोहळा संपन्न

Image
सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करणे ही सामूहिक जबाबदारी - सरन्यायाधीश भूषण गवई नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि १४० वा वर्षपूर्ती सोहळा संपन्न नाशिक   दि. 27  : –  देशातील नागरिकांना राजकीय अधिकार देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती. आजच्या काळात ही समानता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन व वाहनतळाचे भूमिपूजन सरन्यायाधीश  गवई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्या.रेवती डेरे मोहिते, न्या. एम.एन. सोनम, न्या. आर. व्ही. घुगे, न्या. ए.एस. गडकरी, न्या. मकरंद कर्णिक, न्या. सारंग कोतवाल, न्या. जितेंद्र जैन, न्या. अश्विन भोबे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, महारा...

मोबाईल चोरट्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या मुद्देमाल हस्तगत

Image
ना.रोड :- रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीतास पकडण्यात यश त्याच्याकडून चार मोबाईल हस्तगत करण्यात आले.रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथील रेल्वेतील प्रवासी यांचे दिनांक. 25.06.25 रोजी गाडी हावडा मुंबई मध्ये एक्सप्रेस मधून प्रवासी नाव सैफुल रहिमान शेख,राहणार पश्चिम बंगाल यांचा एक काळ्या रंगाचा रियलमी कंपनीचा मोबाईल किंमत १७००० रुपयाचा चोरीस गेला होता.फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.चोरीस गेलेल्या मोबाईलचे मोबाईल ट्रेसिंग प्राप्त करून चोरीचा मोबाईल वापरणार विकास संजय मोरे,राहणार सिन्नर याच्याकडून जप्त करून मुख्य आरोपी भानुदास शेळके,मूळ राहणार शेळकेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर,सध्या राहणार सिन्नर यांचा गुप्त बातमीदारा मार्फत शोध चालू असताना,सदर पाहिजे आरोपी हा रेल्वे स्टेशन नाशिक रोड हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ त्याचा शोध घेऊन त्यास पकडण्यात आले.त्यास गुन्हात अटक करून त्याच्याकडून अजून ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले.दुसरा मोबाईल चोरीचा गुन्हाही उघड करण्यात आला आहे.आरोपीत याच्या कडून ५७१०० रुप...

वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त दि.२९ सोमवारी रोजी सभासद पाल्यांचा सत्कार समारंभ

Image
मविप्र सेवक सहकारी सोसायटीला ४ कोटी ८७ लाखांचा विक्रमी नफा नाशिक :- जिल्हयातील पगारदार पतसंस्थांमध्ये अग्रगण्य असलेल्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल ४ कोटी ८७ लाख ३६ हजार ६५९ रुपये इतका विक्रमी नफा झाला असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष संजय नागरे,यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सोमवार दि.२९ रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह,गंगापूर रोड, नाशिक येथे सेवानिवृत्त सभासद व गुणवंत सभासद पाल्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.सोसायटीची आजमितीस सभासदसंख्या ३,८४३ इतकी असून,भागभांडवल ६० कोटी अठठावन्न लाख नव्यान्नव हजार नऊशे बावीस इतके आहे. कर्ज मर्यादा ५० लाखांपर्यंत आहे. कार्यकारी मंडळाने ६.२५ टक्के लाभांशांची शिफारस केली आहे. कर्ज व ठेवीवरील व्याजदर समान म्हणजे ७ टक्के असणारी पगारदार पतसंस्थांमधील एकमेव पतसंस्था आहे. सभासदांचा मृत्यू झाल्यास २५ लाखापर्यन्त कर्ज माफी दिली जाते. सेवक सोसायटीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाइन सर्व्हर घेतले आहे. स...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर गडचिरोली पोलाद सिटी, ३ संरक्षण कॉरिडॉर्स, दहिसर जागेचे हस्तांतरण यावरही सकारात्मक चर्चा नवी दिल्ली, २६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या दृष्टीने महाराष्ट्र शासन करीत असलेले उपाय इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय सविस्तर चर्चा केली. गडचिरोली पोलाद सिटी गडचिरोली येथे पोलाद सिटीत म...

अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भाऊबीज भेट

Image
दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. २५ : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ₹४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले. भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल, असा विश्वासही मंत्री आदिती ...

वडाळीभोई परिसरातून पर्स हिसकावून पसार गुन्ह्यातील एकास मध्यप्रदेशातून अटक

Image
वडनेर भैरव :- पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजि.नं १०५/२०२५ भा.न्या.स.कलम३०९(४)३(५) अंतर्गत जबरी चोरीचा दाखल झालेला आहे.यागुन्ह्यातील फिर्यादी यश पवार,रा एकदंत नगर अंबड नाशिक हे त्यांच्या मोटरसायकलवर नाशिक कडून मालेगाव बाजूस जात असतांना मुंबई आग्रा महामार्गावर वडाळाभोई गावाच्या उड्डानपुल जवळ मोटारसायकल वरुनच मागच्या वाजून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या, पत्नीची हातातील पर्स हिसकावून २३ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल बळजबरीने चोरुन नेल्या बाबत वडनेर भैरव येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,‌अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह सिंधू,यांनी जिल्ह्यातील उघड न झालेल्या गुन्हयाबाबत आढावा घेऊन गुन्हे उघड करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकास सुचना दिल्या. सूचनानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, यांच्या पथकाने वरील गुन्ह्याच्या समांतर तपासात मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार गुप्त बातमीदाराकडून माहिती घेत मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातून संशयित साजिद रशिद ख...

जिल्हा परिषद पंचायत समिती हरकती कालावधी जाहीर

Image
मुंबई :- राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल. राज्य निवडणूक आयोग

भाजपा कार्यालयात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळा संपन्न

Image
भारताची वाटचाल संपुर्ण आत्मनिर्भर भारताकडे - आ.विक्रम पाचपुते नाशिक : महात्मा गांधींनी स्वातंत्र्य प्राप्ती काळात स्वदेशीचा नारा दिला होता. त्यानंतर राजकीय इच्छा शक्तीच्या अभावामुळे भारत परावलंबी होता. त्यामुळे भारताचे परकीय चलन जास्त जात होते. एक काळ असा होता की भारताला सोने गहाण ठेवावे लागले होते. भारताकडे पहाण्याचा जगाचा द्ष्टीकोण त्यावेळी तुच्छ होता.परंतू २०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले व त्यांनी लोकल फॉर व्होकल व स्वदेशीचा नारा दिला. टाचणी,साबण,टुथ पेस्ट ते विमान निर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात भारताने स्वदेशी उत्पादने निर्माण केली. छोटया छोटया देशांनी पुर्वी अर्थव्यवस्था क्रमवारीत भारताला मागे टाकले होते.आज भारत जागतीक क्रमवारीत चवथ्या क्रमांकावर असून येत्या काही दिवसात भारत तिसऱ्या स्थानी येणार आहे.याचे कारण आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान आहे. दुरदृष्टी व स्वदेशी जनजागर यामुळे देशात स्वदेशी मोहिम यशस्वी झाली असून आता भारत जगाचे नेतृत्व करत असल्याचे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळेचे प्रदेश संयोजक आ.विक्रम पाचपुते यांनी सांगितले.भाजपा नाशिक महानगर ...

आठ वर्षापासून फरार असलेला आरोपीत रेल्वे पोलीसांच्या ताब्यात

Image
आठ वर्षांपासून फरार आरोपीत रेल्वे पोलीसांच्या ताब्यात विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे ना.रोड :- नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाणे यांची कामगिरी नाशिक रोड रे पो स्टे येथे गुरजिन 50/2017 कलम 324,323,504,34 भादवी मधील गुन्ह्यांतील आरोपी नामे सोमनाथ गोविंद कसबे वय 31 वर्षे रा. मालधक्का रोड गुलाबवाडी नाशिक रोड हा गुन्हा घडल्यापासून फरार होता त्यास आज रोजी गुप्त माहिती मिळाल्याने प्रभारी अधिकारी श्री सचिन बनकर साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार पी एस आय श्री सुनील वारूळे व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील,पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील, पोलीस हवालदार राज बच्छाव,आर पी एफ सागर वर्मा,के के यादव,मनिष कुमार यांनी रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे आणले प्रभारी अधिकारी सचिन बनकर, यांच्या समक्ष हजर केले असता आरोपी अटक 23-9-2025 रोजी अटक करून मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दिवाणी व फौजदारी न्यायालय, नाशिक रोड नाशिक यांच्या समक्ष हजर केले. सदरची कार्यवाही स्वाती भोर,पोलीस अधिक्षक,रेल्वे छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड, वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभ...

मविप्र संचालक रवींद्र देवरे यांना मातृशोक

Image
नाशिक : कळवण तालुक्यातील बेज,कुंडाणे येथील प्रगतशील शेतकरी गं.भा. रुक्मिणी शंकरराव देवरे,यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. बाळासाहेब शंकरराव देवरे,यशवंत शंकरराव देवरे,आणि मराठा विद्या प्रसारक समाज,़नाशिक संस्थेचे कळवण व सुरगाणा तालुका संचालक रवींद्र (बाबा) शंकरराव देवरे,यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता कळवण संगमावर होणार आहे.

होरायझन इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये परिवहन समितीची बैठक वाहतूक पोलिसांचे मार्गदर्शन

Image
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज नाशिक :- मविप्रच्या अश्विननगर येथील होरायझन इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये नुकतीच परिवहन समितीची बैठक उत्साहपूर्ण आणि उद्देशपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला शाळा प्रशासनासोबतच वाहतूक विभागातील मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सदस्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित करत काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ मोटार वाहन निरीक्षक वैभव दुबेवार,अंबड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे आणि वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन जाधव उपस्थित होते.मुख्याध्यापिका पूनम सिंह यांनी मान्यवरांचे स्वागत करत बैठकीचे औपचारिक उद्घाटन केले.बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.यामध्ये शालेय वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट,वैध ड्रायव्हिंग लायसन्स, चालक व सहाय्यक यांचे गणवेश, प्राथमिक उपचार पेटी, तसेच प्रत्येक वाहनात अग्निशामक यंत्र असणे ...

त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला प्रकरणी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन

Image
नाशिक :- त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि. संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.याबाबत  जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सोमवार दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदन देण्यात आले. दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी (शनिवार) वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने,यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक करत मारहाण केली.या हल्ल्यात किरण ताजने,गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत.पत्रकार संघटनांनी निवेदनात नमूद केले की, पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे. समाजातील प्रश्न व अन्याय प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणे दुर्दैवी आहे.यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या...

इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघा विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Image
इंदिरानगर :- वसुंधरा सोसायटी पार्किंग समोर चर्च मागे इंदिरानगर वडाळा पाथर्डी रोडजवळ राहणारे,शुभंम परदेशी,आणि त्याचा मित्र आयुष हरसोरा, वसुंधरा सोसायटी विंग ब यांनी ओळखीच्याच असलेल्या महिलेसोबत चार चाकी गाडी पार्किंग दरम्यान झालेल्या वादातून शिवीगाळ करत अश्लील हावभाव करत दमबाजी केल्याने वरील दोघांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं २९२/२०२५ भा.न्या.सं कलम ८९,३५२,३५१(२)३(५)प्रमाणे दि.२०/०९/२०२५ रोजी विनयभंग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेख करित आहे.

कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा - मंत्री गिरीश महाजन

Image
कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा - मंत्री गिरीश महाजन नाशिक येथे कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ‘कुंभ मंथन’; कुंभ मंथनातील सूचनांचा नियोजनात अंतर्भाव करणार नाशिक, दि. २१ : सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वांचा आहे. तो स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. कुंभ मंथनातून प्राप्त सूचनांचा नियोजनात अंतर्भाव करण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आज पंडित पलुस्कर सभागृह (इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक) येथे कुंभ मंथन लोकसहभागातून यशस्वी कुंभमेळ्याकडे हा कार्यक्रम झाला,यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार राहुल ढिकले,आमदार मंगेश चव्हाण,नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर,पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण,आदी उपस्थित होते.मंत्...

गुन्हे शाखा युनिट एकच्या वतीने फरार गुन्हेगाराला अटक

Image
नाशिक :- शहरात प्राण घातक शस्त्र घेऊन फिरणारे दहशत माजवून दंगली घडवून गुन्हे करणारे गुन्हयातील पाहिजे असलेले इसमावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,नाशिक शहर यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे त्या अनुषंगाने किरणकुमार चव्हाण,पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके,सहा पोलीस आयुक्त गुन्हेशाखा,यांनी गुन्हेशाखेचे पथक तयार करून मार्गदर्शन केले.व दि.२४/०१/२०२४ रोजी दाखल गु.रजि.नं २९/२०२४ गुन्ह्यांत विविध कलमा अंतर्गत हवा असलेला आरोपीत अरफात पठाण,याचा शोध घेण्यासाठी आदेश देण्यात आले होते.त्याबाबत गोपनीय बातमीदाराकडून पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे,पोलीस अंमलदार मुक्तार शेख,यांना माहिती मिळाली की गुन्ह्यांत हवा असलेला अराफत पठाण,हा शिवाजी चौक कथडा जुने नाशिक या भागात फिरत आहे.ती माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,यांना दिली असता त्यांनी पथकातील गुन्हे शाखा युनिट एकचे पो उपनिरीक्षक सुदाम सांगळे,पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे,प्रशांत मरकड,विशाल काठे,नजीमखान पठाण,विशाल देवरे,मिलिंदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार मुक्तार शेख,चालक पोलीस हवालदार सुखराम पवार, कारवाई कर...

प्रभाग क्र.२३ मधील विकासकामांसाठी माजी नगरसेविका रुपाली निकुळे यांची मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत मागणी

Image
इंदिरानगर :- प्रभाग क्रमांक २३ च्या माजी नगरसेविका रुपाली निकुळे यांनी राज्याचे जलसंपदा पुनर्वसन, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना प्रभागातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देत निधीची मागणी केली आहे.यामध्ये दिपाली नगर हायवे ते विनय नगर चौक हा रस्ता क्राॅक्रीटीकरण,पेव्हर ब्लॉक बसवणे,पखाल रोड ते आठवण हॉटेल १८ मीटर डीपी रोड खडी करण डांबरीकरण फूटपाटवर पेव्हर ब्लॉक बसवणे,शिवाजी वाडी जवळ नासर्डी (नंदिनी)नदीवर समांतर पूल बांधणे प्रभागातील विनय नगर, दिपाली नगर,सुचिता नगर,अमृत वर्षा कॉलनी,साईनाथ नगर, अशोका मार्ग डिजेपी नगर,खोडे नगर,विधाते नगर,कल्पतरू नगर,इंदिरानगर परिसरातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण पेव्हर ब्लॉक बसवणे आदी कामांसाठी निवेदनात निधी मागणी करण्यात आली आहे.  

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पोलीस अधीक्षक महिला अंमलदारांना सन्मान पुर्वक प्रदान

Image
पुणे :- दि.१९/०९/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा सन २०२५ समारंभ कार्यक्रम राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक -२ राम टेकडी पुणे येथे पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तव्य मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस घटकांना बक्षीस वितरण करण्यात आले.सन 2017 पासून महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत सीसी टीएन एस (CCTNS) प्रणालीमध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस घटकांना बक्षीस प्रदान करण्यात येते. सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा जास्तीत जास्त वापर गुन्हे प्रगटीकरण, गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी करण्यात यावा.याकरिता CES ranking त्याआधारे पोलीस घटकांकडून मासिक कामगिरीचा आढावा घेण्यात येतो त्यानुसार नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत राज्यात सीसी टी एन एस प्रणालीमध्ये नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन २०२५ या वर्षाचे द्वितीय क्रमांक पारोतोषीक जाहीर झाले राज्यात सीसीटीएनएस कार्यप्रणाली अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये प्रथम विजेता सांगली पोलीस घटक असून किती क्रमा...

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून जखमी पत्रकारांची रुग्णालयात भेट

Image
मारहाण करणाऱ्यांवर काठोरात कठोर कारवाई करण्याच्या मंत्री छगन भुजबळ यांचे पोलिस अधिक्षकांना आदेश नाशिक,दि.२० सप्टेंबर :- त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना, स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार योगेश खरे,अभिजीत सोनवणे,किरण ताजणे यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणी मध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्रकार किरण ताजणे यांची मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मारहाण करणाऱ्या गुंडांना कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांना दिल्या. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी नाशिक येथून पत्रकार बांधव त्र्यंबकेश्वर येथे गेले असता स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना अडवण्यात आले. पत्रकार बांधवांनी आपली ओळख देऊन बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असल्याची माह...

तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला पुढे न्या - मंत्री छगन भुजबळ

Image
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा - मंत्री छगन भुजबळ नागपूर,दि.१९ सप्टेंबर:- लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे. या काळात आपल्यावर अनेक हल्ले होतील मात्र न घाबरता न डगमगता आपल्याला त्यावर प्रतिहल्ला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला पुढे न्यायचे आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे चिंतन शिबीर नागपूर येथे पार पडले. या शिबिराच्या उद्दघाटन प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्यासह राज्यमंत्री मंडळातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मंत्री, आमदार, खासदार व प...

त्र्यंबकेश्वर नगरपरिषद पदाची सुत्रे राहुल पाटील यांनी स्वीकारले

Image
त्र्यंबकेश्वर :- चोपडा नगर परिषदेतून त्र्यंबकला बदलून आलेले मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी त्रंबकेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी पदाचा कारभार स्वीकारलेला आहे.प्रशासक या नात्याने ते कारभार पाहणार आहे.आगामी सिंहास्थ कुंभमेळा लक्षात घेता कोण मुख्याधिकारी त्रंबकेश्वरसाठी येणार याकडे जनतेचे त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचे देखील लक्ष लागलेले होते.कार्यरत आणि दक्ष मुख्याधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यात राहुल पाटील,यांची ओळख होती.त्रंबकेश्वर देवस्थानचे पदसिद्ध सचिव म्हणून देखील काम  बघणार आहेत.भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता,सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी पाटील यांनी त्र्यंबकेश्वर नगरीत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिका प्रशासकीय अधिकारी विजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी अभियंता स्वप्नील काकड, नगररचनेचे मयूर चौधरी ,तसेच अकाउंट विभागाचे मोहन नादरे व अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप शिबिर

Image
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी जयंतीपर्यंत राज्यभर विशेष मोफत नेत्रतपासणी शिबिर. 👁️ मोफत नेत्र तपासणी 👓 मोफत चष्मा वाटप 🩺 मोफत शस्त्रक्रिया 📞 वैद्यकीय सहाय्यासाठी संपर्क : 1800 233 2211 Cmrf Maharashtra मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,अधिकृत

लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात अवैध क्रेडिट कार्ड कर्ज वसुली कॉल सेंटरवर कारवाई

Image
बातमी संदर्भातील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची माहिती बघण्यासाठी क्लिक करावे नाशिक :- नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैधपणे चालवण्यात येणारे विविध कॉल सेंटर ची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे सूचना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, यांच्याकडून देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, यांना व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि.१५/०९/२०२५ रोजी सायंकाळी मीनाताई संकुले इगतपुरी येथे अवैध्यरित्या चालवण्यात येणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. सदरच्या ठिकाणी क्रेडिट कार्ड वर दिले जाणारे कर्ज,ग्रहकर्ज संबंधित कर्ज वसुलीसाठी कर्ज घेणारे खातेदार त्यांचे नातेवाईक मित्र व शेजारी यांच्याशी संपर्क साधून बँकेची बनावट ओळख धारण करून बेकायदेशीर पुणे कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटल्याने इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं १७७/२०२५ भा.न्या.स.३१८(४)३१९(२)६२,३(५) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

लाडकी बहीण योजनेबाबत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

Image
‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन मुंबई, दि. १९ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे, असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन केवायसी करणे बंधनकारक असून, यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून लाडक्या बहिणींना योजनेंतर्गत लाभ वेळेत व अचूक मिळण्यास मदत होणार आहे.या केवायसीमुळे महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या इतर योजनांचा लाभही प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे मिळणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्रामधून माफक दरात सेवा

Image
मुंबई, दि. १८ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी केंद्रामधून (Common Service Centre) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार (MOU) महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सीएससी केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला असल्याची माहिती अण्णासाहेव पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.या करारानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यासारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहे. सीएससी केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सीएससी केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्...

रेकाॅर्डवरील आरोपीस जेरबंद करण्यास यश दोन गुन्हे उघडकीस

Image
ना.रोड :- रेल्वे पोलीस ठाणे नाशिकरोड येथे दि. 16.09.2025 रोजी गस्तकामी रेल्वे स्टेशन नाशिकरोड येथील सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे, पाटील,पो.हवा. 520 शैलेंद्र पाटील,पो.हवा. 217 राज बच्छाव,हे रेल्वे सुरक्षाबल नाशिकरोड येथील मनिशकुमार सिंह, के.के. यादव ,सागर वर्मा,यांचे सोबत गस्त करीत असतांना त्यांना ६ वा. दरम्यान रेकाॅर्डवरील आरोपीत फैसल अजिज खान रा. रमाबाई नगर मनमाड ता.नांदगाव जि.नाशिक हा रेल्वे स्टेशन नाशिकरोड येथील मेन गेट जवळील हनुमान मंदीराजवळ दिसून आल्याने त्याचे जवळ जावुन त्याची झडती घेतली असती त्याचे कडे एक विवो कं.चा गोल्डन रंगाचा मोबाईल व दुसरा ओपो कं.चा निळया रंगाचा मोबाईल असे दोन मोबाईल मिळुन आल्याने त्यास सदर मोबाईल बाबत विचारपुस केली असता उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणुन हजर केले. आरोपी कडे मिळुन आलेले मोबाईल बाबत रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे पडताळणी केली असता गु.र.नं. 179/2025 कलम 303(2) बी.एन.एस.मध्ये व गु.र.नं. 178/2025 कलम 305(सी) बी.एन.एस. मध्ये मोबाईल चोरीस गेलेले निष्पन्न झाले रेकाॅर्डवरील आरोपी फैजल अजिज खान,याचे कडे अधि...

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी अर्ज स्वीकृती प्रक्रियेत सुलभता

Image
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी दिलेली माहितीच अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरावी मुंबई, दि. १७:- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान उत्पन्नांचा दाखला, वैयक्तिक माहिती व कागदपत्रे सादर केलेली असतात. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पडताळणी केलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत शिष्यवृत्तीसाठी तीच माहिती देण्याची आवश्यकता नसून हीच माहिती ग्राह्य धरावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी प्रशासनाला देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC),आर्थिक दुर्बल घटक (EWS) सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) आणि इतर सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शि...

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय शुभारंभ मुंबई, दि. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार येथून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून सहभाग घेतला. त्यानंतर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथून या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.या राज्यस्तरीय शुभारंभाच्या वेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे, सार्वजन...

मराठा हायस्कूल मध्ये ओझोन दिन उत्साहात संपन्न

Image
नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये ओझोन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर _________________________________________ नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये ओझोन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात होते.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक संजय ठाकरे,पर्यवेक्षक देविदास भारती,विजय पवार व प्रताप काळे उपस्थित होते.प्रांजल जानराव व कार्तिकी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगतात थोरात सर म्हणाले आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.आपल्या वातावरणातील सर्वात महत्त्वाचा थर म्हणजे ओझोन थर.हा थर आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवतो.आजचा हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे,पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा वापर करणे,जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचविणे हा आहे. ओझोन थर वाचवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.सूत्रसंचालन लावण्या महाले व वेदिक...

प्रशासकीय इमारती आता नमुना नकाशानुसार बांधणे बंधनकारक - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारतींना आता एकच नमुना नकाशा मुंबई, दि. १७: राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच (टाईप प्लॅन) बांधणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.नगरपरिषदा व नगरपंचायत, पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांची संख्या व शहरांची लोकसंख्या विचारात घेऊन नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा नमुना नकाशा (Type Plan) सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांच्याकडून मंजूर करुन घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींनी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम या नमुना नकाशाप्रमाणे करणे बंधनकारक असणार आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे मात्र काम सुरू झाले नाही अशा ठिकाणी देखील आता नवीन नमुना नकाशानुसारच बांधकाम करावे लागणार आहे. ज्या शहरात नगरपरिषद अथवा नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत नाही तेथे प्राधान्याने या कामासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले...

विश्वबंधुत्व दिना निमित्त वकृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

Image
नाशिक - विश्वबंधुत्व दिना निमित्त आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धात१५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वरा धांडगे, हिला मिळाले.पाथर्डी फाटा येथील आर.के.लॉन्स येथे झालेल्या स्पर्धेत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषण उपस्थित विद्यार्थ्यांनी केले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, प्रभाग क्र.३१ मधील भाजपाचे माजी नगरसेवक नवले, पाथर्डी मंडलाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया,यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक महेश कुलकर्णी,यांनी केले.दरम्यान एक दिशा साहस फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गायकवाड,यांनी विद्यार्थी घडविण्यात शिक्षक आणि पालक यांचा महत्त्वाचा वाटा असतो असे सांगून स्वरा धांडगेला प्रथम पारितोषिका बरोबर तिच्या साठी शालेय साहित्याची मदत फाउंडेशन कडून केली जाईल असे जाहीर केले.यावेळी स्पर्धेत सहभाग घेतलेले विद्यार्थी पालक नागरिक उपस्थित होते.

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयास वाढीव ३० जागांची मान्यता कार्यकारिणीच्या पाठपुराव्यास यश

Image
मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयास वाढीव ३० जागांची मान्यता कार्यकारिणीच्या पाठपुराव्यास यश, २०२५-२६ शैक्षणीक वर्षापासून होणार विद्यार्थ्यांना लाभ नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलीत डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयास वाढीव ३० जागांची परवानगी मिळाल्याने आता एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाची क्षमता १२० वरून वाढ होऊन १५० झाली आहे.जागावाढीसाठी मविप्र कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय प्रशासन ऑक्टोबर २०२४ पासून शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास अर्ज करण्यात आला होता. या जागा वाढीसाठी नॅशनल मेडीकल कमिशन (दिल्ली), महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (मुंबई) आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) या तीनही संस्थांच्या कठीण अशा मूल्यांकन आणि क्रमवारी निश्चिती प्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण कराव्या लागतात. मविप्रने या संस्थांची प्रत्येकी एक मूल्यांकन तपासणी यशस्वी रित्या पूर्ण केली असून महाविद्यालयास जागा वाढीचे परवानगी पत्र प्राप्त झाले आहे.शैक्षणीक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्...

खिराड आश्रमशाळेतील अन्न पाणी पुरवठा तपासण्यात यावा विद्यार्थीनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल

Image
खिराड आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी पालक विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे अभोणा :- दि.१०/०९/२०२५ खिराड आश्रम शाळेतील इयत्ता अकरावी शिकणाऱ्या मुलीला दहा दिवसापासून ताप येत असुनही आश्रमशाळेतील अधिक्षक मुख्याध्यापक, यांनी योग्य काळजी न घेतल्याने पालकवर्ग संतापले फक्त तापाच्या गोळ्या देण्याचे काम. वैद्यकीय उपचारासाठी लवकर दवाखान्यात दाखल केले गेले नसल्याने हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.याप्रकरणी उशीरा दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी नऊ वाजता अभोना येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.खिराड आश्रम शाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी आश्रम शाळेत किती मुली आजारी आहेत याबाबत चौकशी करून सदर मुलींना अभोणा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करावे तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासावेत व अन्नपुरवठा योग्य आहे का याबाबत लक्ष घालावे तसेच कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी आश्रम शाळेतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत ते पिण्यासाठी योग्य आहे का तसेच सदर सर्व आश्रम शाळेला आहार पुरवणाऱ्या संस्था आश्रम शाळेत जेवणाचा आहा...

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक - सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

Image
राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय लवकरच छत्रपती संभाजीनगर, दि. १३ : सामाजिक न्याय विभाग हा समाजातील तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेला शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाने हाती घेतलेल्या समाज हिताच्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची साथ अत्यावश्यक असल्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,असे त्यांनी यावेळी जाहीर केले. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोनदिवसीय बैठकीचे उद्घाटन आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याणम...