आम आदमी पार्टीच्या वतीने ED,CBI सरकारचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन

नाशिक :- खासदार संजय सिंह यांना ईडीने सूडबुद्धीने अटक केल्यामुळे, आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने केंद्र सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा,काढत आंदोलन
अंमलबजावणी संचालनालयाने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापेमारी केली. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणासंदर्भात चौकशीसाठी हा छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीनंतर सलग 10 तास संजय सिंह यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. 

संजय सिंह यांच्या घरातील वस्तू ईडी कडून अक्षरशा कचऱ्या सारख्या फेकून देण्यात आल्या, संजय सिंह यांच्या परिवाराला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही अटक म्हणजे सरकारने ईडीला पुढे करून बदला घेण्याची चुकीची मानसिक प्रवृत्ती होय, दिवसेंदिवस आम आदमी पार्टीच्या प्रामाणिक लोकांना जेलमध्ये टाकण्याचा जो घाट मोदी सरकारने घातला आहे तो लोकशाही विरोधी आहे.यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी नविदंर अहलूवालिया,चंदन पवार,यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.ईडी सीबीआय कारवाई वर प्रश्न उपस्थित करत निषेध नोंदवला 

या अटकेविरोधात आम आदमी पार्टी नाशिकने केंद्र सरकारची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक शवयात्रा काढून केंद्र सरकार आणि ईडी विरोधात घोषणा देत जाहीर निषेध नोंदविला आला आहे, यावेळी सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच आपचे राज्य संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, राज्य मीडिया प्रमूख चंदन पवार, पदाधिकारी स्वप्निल घिया, योगेश कापसे, शुभम पडवळ, विकास पाटील, अभिजीत गोसावी, पद्माकर अहिरे, अनिल फोकने, प्रदीप लोखंडे, नूतन कोरडे, अनिल कौशिक, प्रभाकर वायचळे, कलविंदर गरेवाल, अल्ताफ शेख, अमित यादव, सुमित शर्मा, अमर गांगुर्डे, प्रमोदीनी चव्हाण, निर्मला दानी, शांताबाई बनकर, मिना अग्रवाल, भूषण पाटील, दिपक सरोदे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला