नाशिक विभागातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि. 11 : नाशिक विभागातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामाना गती देऊन ती कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

नाशिक विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधीक्षक अभियंता अजय सिंह, नाशिक विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री  पाटील म्हणाले, नाशिक विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ज्या पाणीपुरवठा योजनाच्या कामाला कार्यारंभ आदेश दिला नसेल अशा कामांना तत्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावा. ज्या गावातील पाणीपुरवठा योजनाना अडचणी असतील त्यासाठी तेथील ग्रामसभेचा ठराव घेऊन निर्णय घ्यावा. यासाठी लोकप्रतिनिधीचे सहकार्य घ्यावे तसेच जे ठेकेदार काम करत नाही त्यांच्यावर कारवाई करावी.

त्रयस्थ तपासणी संस्थांनी पाणीपुरवठा योजनाच्या कामाची काटेकोरपणे तपासणी करावी आणि तपासणी अहवाल हा दर पंधरा दिवसांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावे. आदिवासी गावातील घरगुती नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. हर घर जल कामाची उद्दिष्टे 26 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी ग्रामसभा घेऊन उद्दिष्ट पूर्ण करावीत. तसेच शिल्लक निधी लवकरात लवकर खर्च करण्याचे निर्देशही  पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी त्यांनी जळगाव ग्रामीण आणि धरणगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचाही आढावा घेतला.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला