माझी माती माझा देश "या अभियाना अंतर्गत जुने नाशिक भागात रॅली
"माझी माती माझा देश "या अभियाना अंतर्गत आज नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक पूर्व विभागाच्या वतीने जुने नाशिक परिसरात भव्य रॅली काढन्यात आली होती.या रॅलीचे प्रमुख नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे, विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांसह सारडा कन्या विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थिनी आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. माझी माती माझा देशा चा "अमृत कलश" नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे यांच्याकडे विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी सुपूर्द केला. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सहाही विभागीय कार्यालयात अमृत कलश यात्रा माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत राबविली जात असून पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने मेन रोड परिसर अब्दुल हमीद चौक मार्गे भद्रकाली दूध बाजार, बादशहा चौक,गाडगे महाराज पुतळा, मार्गे नाशिकपूर्व विभागीय कार्याल मेनरोड येथे रॅली संपन्न झाली. "भारत माता की जय" "वंदे मातरम" च्या जयघोषात मातीचा कलश घेऊन सारडा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनीं, शिक्षक आणि मनपा अधिकारी कर्मचारी यांनी रॅलीत सहभाग नोंदवला. या रॅलीचा समारोप नाशिक पूर्व विभागीय कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे यांनी या अमृत कलशाचे महत्व उपस्थिताना विशद करून देशभक्तीपर नवंचेतना जागविण्याच्या दृष्टीने हा "अमृत कलश "नाशिक ते मुंबई व मुंबई ते दिल्ली प्रवास करून दिल्ली येथें निर्माण होणाऱ्या अमृत उद्यानात नाशिकच्या मातीचा देखील सहभाग असेल असे नमूद करून पर्यावरण पूरक जनजागृतीचा संदेश या रॅली द्वारे देण्यात आला.देशभक्तीपर वातावरण निर्मिती करण्याचे कार्य सारडा कन्या विद्यालयाने केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन यावेळी डॉक्टर विजयकुमार मुंडे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले. नेहरू युवा केंद्राच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या कलश घेऊन जाणारे युवा स्वयंसेवक ज्येष्ठ अभिनेते प्रथमेश जाधव कंकाल यांचे स्वागत विभागीय अधिकारी राजारामजी जाधव यांनी केले यावेळी उप अभियंता भुगयो गाजूल , उप अभियंता पाणीपुरवठा नाईक, अभियंता सार्व. बांधकाम श्री दारासिंग जाधव, डी बी जगताप भु. ग. यो, करके विद्युत विभाग, पैठणकर विद्युत विभाग, सारडा कन्या शाळेचे उपमुख्यद्यापक गंगाधर बदादे, शिक्षक श्रीमती चंद्रात्रे, सूर्यभान जगताप सर, ओमकार वैरागकर ,. नाशिक पूर्व विभागातील प्रभारी अधीक्षक श्री चंदन घुगे परदेशी कापसे , गजानन मोरे, श्रीमती पगारे, जुबेर सय्यद विक्रम रेवर, सारंग व कुणाल जाधव ,अनिकेत खेलुकर गणेश कासार इ. उपस्थित होते.
Comments
Post a Comment