शाहू फुले आंबेडकरांचे विचार बळकट करण्यासाठी शरद पवारांना साथ द्या - सचिन पिंगळे
नाशिक :- सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणात शाहू, फुले, आंबेडकरवादी पुरोगामी विचारांचा संकोच केला जात असून असे विचार बासनात बांधून फक्त सत्ता उबविण्याचे काम सुरू आहे ,अशा काळात खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार पुढे नेणारे शाहू ,फुले, आंबेडकरांचे खरे वारसदार शरदचंद्वार पवार यांना साथ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी संचालक सचिन पिंगळे यांनी केले आहे.
जिल्ह्यामधील मान्यवर व कार्यकर्त्यांशी चर्चा करून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचा निर्णय झाल्यानंतर मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांच्या हस्ते सचिन पिंगळे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड , शहराध्यक्ष गजानन शेलार,माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,दत्तात्रय माळोदे,युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे,कार्याध्यक्ष गणेश गायधनी आदिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सचिन पिंगळे हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व शरद पवार समाजवादी काँग्रेस पासूनचे निकटवर्तीय एॅडवोकेट पंडितराव पिंगळे यांचे चिरंजीव असून ,पक्षांमध्ये जवळपास 17 वर्षे ते जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद ही त्यांनी भूषविले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक व नामांकित अशा मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक पद ही त्यांनी भूषविले आहे ,त्यांच्या सहकार्याने नाशिक शहर ,तालुका व जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीकरनाला मदत होईल असा आशावाद महबूब शेख, कोंडाजी आव्हाड व गजानन शेलार यांनी व्यक्त केला आहे .
Comments
Post a Comment