मखमलाबाद विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय सायकलींग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन मविप्र संचालक रमेश पिंगळे हे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपिठावर मा.नगरसेवक दामोधर मानकर,सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाळु काकड,प्रभाकर पिंगळे,जिल्हा क्रीडा कार्यालयीन अधिकारी अरविंद खोडेकर,संघटना प्रमुख नितीन नागरे,के.टी.एच.एम.काॅलेजचे लवांड सर,उपप्राचार्य रविद्र गाडे,अभिनवचे मुख्याध्यापक सी.बी.पवार आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या शुभहस्ते बजरंग बलींच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविकात सायकलिंग स्पर्धेसंबंधी माहिती दिली.मा.नगरसेवक दामोधर मानकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले.नितीन नागरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे सर्व नियम व सुचना यांची सखोल माहिती दिली.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना सायकलिंगचे व खेळाचे महत्व सांगितले तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये मनपा व नाशिक ग्रामीण या दोन विभागात १४,१७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या संघामध्ये एकुण १६५ खेळाडु सहभागी झाले होते.सुत्रसंचलन जेष्ठ क्रीडाशिक्षक अनिल पगार यांनी केले.आभार प्रदर्शन उपप्राचार्य रविंद्र गाडे यांनी केले.या स्पर्धा यशस्वितेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाअंतर्गत संघ व्यवस्थापक व पंच तसेच विद्यालयातील जेष्ठ क्रीडाशिक्षक अनिल पगार,दिलीप सोनवणे,नितीन जाधव,ज्युनियर काॅलेजचे क्रीडाशिक्षक डेर्ले सर,बाबाजी मुरकुटे,नितीन भामरे,संतोष उशीर,एन.सी.सी.आर्मी ऑफीसर भास्कर भोर,नेव्हल ऑफीसर दयाराम मुठाळ,सोमेश्वर मुळाणे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन