प्रा. डी. एच. शिंदे यांना पुणे विद्यापीठाची 'विद्यावाचस्पती' पदवी प्रदान
.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. आर. टी. आर्ट्स, बी. एच. कॉमर्स ऍन्ड ए. एम. सायन्स (के.टी.एच.एम.) कॉलेज, नाशिक येथील समाजशास्त्र विभागातील प्रा. दिपक हरिभाऊ शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे कडून मानवविज्ञान विद्याशाखे अंतर्गत समाजशास्त्र विषयात 'विद्यावाचस्पती' ही पदवी घोषित झाली आहे. यासाठीची अंतिम मौखिक परीक्षा (Final Viva-Voce) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे मंगळवार, दि. ०३ ऑक्टोबर रोजी डॉ. श्रुती तांबे मॅडम (विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, सा. फु. पु. वि., पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग येथे ऑफलाईन पार पडली. या प्रसंगी सन्मानिय प्रोफेसर (डॉ.) आर. बी. पाटील (विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते.
त्यांचा संशोधनाचा विषय : "नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या जमीन विषयक मालकीचा समाजशास्त्रीय अभ्यास"असा होता.
त्यांना प्रोफेसर (डॉ.) संजय सावळे, विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, मविप्र समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक.यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष श्री. विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी.दरेकर, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील संशोधनात्मक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.
Comments
Post a Comment