मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवासा’करिता प्रस्ताव पाठविण्याचे संस्थांना आवाहन
मुंबई, दि. ५ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली एमएच०३इएच (MH03EH) ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी एमएच०३इजे (MH03EJ) नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल, त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI (EAST)) किंवा RTO MUMBAI (EAST) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह 9 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास राज्य शासनाच्या 8 मे 2016 च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला