मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून महात्मा गांधी,माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
नाशिक,दि.२ ऑक्टोबर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील भुजबळ फार्म येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर त्यांच्या प्रतिमांना पुष्पहारअर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबरोबरच स्वातंत्र्योत्तर काळात देखील देशाच्या जडणघडणीत या दोन्ही विभुतींनी मोलाचे योगदान दिले. त्यांची कठोर तत्त्वनिष्ठा आणि निस्सीम देशप्रेम सर्व भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment