मान्यवरांच्या उपस्थितीत गोदावरी पुजन महा आरती
नाशिक मध्ये गोदावरीचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने उत्तमरीत्या काम होत असून पुढे होऊ घातलेल्या २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्या पर्यंत प्लास्टिक मुक्त गोदावरीचा संकल्प आपण सर्वजण करून गोदावरी नदीला शुद्ध करू असे आवाहन अध्यात्मिक गुरु श्री.एम.यांनी केले.
स्वच्छता अभियाना अंतर्गत गोदावरी प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने अविरल गोदावरी अभियान हाती घेण्यात आले आहे.त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी गोदापूजन दादा महाराज जगताप,
योगयोगेश्वर जय शंकर सेवाभावी संस्थाचे प्रमुख
गोदा पूजन करून अविरल गोदावरी कार्यक्रम शुभारंभ झाला.
अध्यात्मिक गुरू श्री एम,मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर,जिल्हाधिकारी जलज शर्मा, सिनेअभिनेता चिन्मय उदगिरकार यांच्या हस्ते गोदामाईची महाआरती करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमात बोलताना अध्यात्मिक गुरु श्री एम सर यांनी सांगितले की,नाशिक मध्ये जे कार्य होत आहे ते कार्य उत्तमरीत्या होत असून अशाच पद्धतीने काम करून आगामी होऊ घातलेल्या २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्या पर्यंत प्लास्टिक मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेणे महत्त्वाचे असून सर्वांनी या कार्यात सहभाग नोंदवून प्लास्टिक मुक्त व प्रदूषण मुक्त गोदामाई करण्याचे आवाहन अध्यात्मिक गुरु श्री एम. यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की नाशिक मध्ये स्वच्छता हे एक प्रमुख ध्येय असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे,त्याचबरोबर हरित नाशिक, स्वच्छ नाशिक करून आगामी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हरित कुंभ म्हणून केला जाईल त्यामध्ये सर्वांचे सहकार्य व भूमिका महत्त्वाची असून त्यातून हरित कुंभ होईल असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास अध्यात्मिक गुरु श्री एम सर,मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा,मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,लक्ष्मण सावजी, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे नाशिक चे पदाधिकारी जितूभाई ठक्कर,हेमंत राठी, नमामी गोदाचे राजेश पंडित, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, माजी नगरसेविका,स्थायी सभापती हिमगौरी आडके,सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार,मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे,विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
Comments
Post a Comment