नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालय अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिक विक्री विरोधात कारवाई

नाशिक :- नाशिकरोड येथे दिनांक ७  ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई करून१०००० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच जेलरोड येथील भाजी मार्केट येथे प्रथम दंड रक्कम रुपये ५००० करण्यात आला असा एकूण १५००० रुपये दंड करण्यात आला. सदर कारवाई नाशिक महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या आदेशान्वये नाशिकरोड विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, सागर  बारगळ, तेजस गायकवाड, स्वच्छता मुकादम रणजित हंसराज, सुनील वाघ, गुलाब शेख, अतुल भाऊसार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग व इतर वस्तू वापरू नये असे आवाहन यापूर्वी नाशिक महानगरपालिकाच्या वतीने करण्यात आले आहे,मात्र व्यवसायिक याचा वापर करतांना आढळल्यास धडक दंडात्मक व असे साहित्य जप्त करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन