जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभार्डे येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी


बागलाण :- जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभार्डे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली प्रतिमापूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य श्री सत्यम साहेबराव चव्हाण यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी महात्मा गांधीजींचे व लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्यसंग्रामाकरिता केलेल्या कार्याची माहिती करून दिली विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती वाघ एस आर व श्री सरोदे एस एन यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधीजींचे व लालबहादूर शास्त्री यांचे शिक्षणाबद्दल असलेले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निकम जे एस यांनी केले. तसेच या प्रसंगी सर्वांनी 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमांतर्गत गावातील परिसर स्वच्छ केला या प्रसंगी      माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष ठाकरे सतीश कुमार उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री अरुण वाघ  गावाचे सरपंच श्रीमती प्रतिभा अरुण वाघ उपसरपंच  रामराव नामदेव ठाकरे ग्रामसेविका श्रीमती पाटील व्हि डी  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वच्छता ही सेवा ही शपथ घेतली आलेल्या पाहुण्यांचे आभार ज्येष्ठ शिक्षक सरोदे एस एन यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला