ना.रोडला महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम

नाशिक :- नाशिकरोड भागातील नेहरू गार्डनला झालेल्या नविन भिंतीला रस्त्यालगत वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या टपऱ्या व वडनेर दुमला अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.
नाशिक महानगरपालिका हद्दीतील मागील बऱ्याच दिवसापासुन नाशिकरोड भागातील नेहरू गार्डनला झालेल्या नविन भिंतीला रस्त्यालगत वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या काही टपरी धारकांनी स्थायी समितीचे ठराव दुकानाला लावून व्यवसाय थाटलेले होते. या टपरी धारकांना वेळोवेळी टपरी हटविण्याच्या सूचना अतिक्रमण विभागामार्फत देण्यात आलेल्या होत्या. 
अखेर  आयुक्त डॉ अशोक करंजकर यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त नितीन नेर , विभागिय अधिकारी मदन हरिशचंद्र यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम घेण्यात आली.या मोहीमे दरम्यान नाशिक महानगरपालिका. नाशिक अतिक्रमण विभागातील सर्व कर्मचारी, पोलीस प्रशासन, बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, वैद्यकीय विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. मनपाचा अतिक्रमण निर्मुलनाचे पथक सदर ठिकाणी दाखल होताच सदर अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण स्वता: काढुन घेतले. तसेच शुभाष रोड येथील नैसर्गिक नाल्यावर ठेवण्यात आलेल्या दोन अनधिकृत टपऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर सदर पथक वडनेर दुमाला या ठिकाणी असलेल्या मनपाच्या आरक्षित जागेवर अनधिकृतपणे आर.सी.सी. बांधकाम करण्यात आलेले होते सदर अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. यापुढे हि मनपा हद्दीत कुठेही अनधिकृत अतिक्रमण केल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.तरी कुणीही अनधिकृत अतिक्रमण करू नये असे आवाहन मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला