शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
दिंडोरी :- शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व दिंडोरी शिवसेनेच्या वतीने कोजागिरी पौर्णिमानिमित्त सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी लखमापुर फाटा येथे मोफत वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात आला.
शिवसेनेच्या ब्रिद वाक्यानुसार ८०% समाजकारण २०% राजकारण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सचिव भाऊसाहेब चौधरी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख रामजी राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली २ दिवस या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिंडोरी लोकसभा मा.खा. हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेना संपर्कप्रमुख सुनील पाटील, मा.आ.धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे,सहकार नेते सुरेश डोखळे, बाजार समिती संचालक नरेंद्र जाधव, युवा नेते वैभव महाले, तालुकाप्रमुख किशोर कदम, डॉ.पानगव्हाणे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हाप्रमुख कृष्णा देशमुख, शहराध्यक्ष सुरेश देशमुख, शिवसागर पवार, गुलाब थेटे, मयुर देशमुख, सुनिल निमसे, किरण देशमुख, रोशन लगड, संकेत देशमुख, मयूर लगड, अजिंक्य दिघे, सचिन परदेशी, विलास जाधव, शरद उगले, नितीन सोनवणे, राहुल सोनवणे, गणेश साळुंखे आदी उपस्थित होते.याप्रसंगी ट्रायडेंट हॉस्पिटल दिंडोरी व समर्थ क्लिनिक लखमापुर फाटा यांच्या विशेष सहकार्याने सदरचा उपक्रम पार पडला.
Comments
Post a Comment