मनपा अधिकारी कर्मचारी सेवापुर्ती सोहळा संपन्न
नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सेवापूर्ती सत्कार समाज कल्याण उपायुक्त प्रशांत पाटील व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या हस्ते करण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतून सप्टेंबर महिन्यात अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी,वैद्यकीय अधिकारी निना महाजन,वरिष्ठ लिपिक शारदा दाणी,स्टाफ नर्स सुनीता केदारे,लीडिंग फायरमन शेख इकबाल कासम, सुभाष निकम,शेख तोसिफ इब्राहिम, वायरमन रवींद्र जाधव,शिपाई मुरलीधर सरिक्ते,माळी पोपट शिराळ,सुरक्षारक्षक भगवंता तिदमे,बिगारी उत्तम केदारे,सफाई कर्मचारी कैलास गायकवाड,जिजा साळवे,कैलास जमधडे आदी सेवानिवृत्त झाले.
सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार समाज कल्याण उपायुक्त प्रशांत पाटील व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केला. यावेळी पुढील आयुष्यातील वाटचालीस उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यया कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment