दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यासाठी पूर्व तपासणी शिबिर संपन्न

नाशिक :- केंद्र शासनाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत ALIMCO, मुंबई यांचे तर्फे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यासाठी पूर्व तपासणी शिबिर,लक्षिका मंगल कार्यालय,सिटी सेंटर मॉल समोर,नाशिक येथे दिनांक 26/10/2023 रोजी घेण्यात आले.
तपासणी शिबिरा वेळी नाशिक शहर व नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांची दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार नोंदणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी करून पात्र असणाऱ्या 400 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने केंद्र शासनाच्या ALIMCO तर्फे लवकरच पुरवली जाणार आहेत.
दिव्यांग बांधवांची नोंदणी, कागदपत्रांची तपासणी, मार्गदर्शनासाठी समाज कल्याण विभाग, नाशिक महानगरपालिका,पंचायत समिती नाशिक च्या कर्मचारी,अधिकाऱ्यांतर्फे व्यवस्था करण्यात आली होती.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन