मखमलाबाद विद्यालयातील कु.राणी पागी हिचे चित्रकला स्पर्धेत उत्तुंग यश
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथील विद्यार्थिनी कु.राणी पागी इयत्ता 10 वी ड हिने उदोजी होरायझन,गंगापुर रोड,नाशिक येथे रोटरी क्लबतर्फे झालेल्या भव्य चित्रकला स्पर्धेत इ.9 वी / 10 वी च्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. तिला रोटरी क्लब तर्फे प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह,मेडल,पुस्तक,1100/- रु.रोख,1000/- रु.चे व्हाऊचर,सरप्राईज गिफ्ट अशी विविध बक्षिसे मिळाली. ही सर्व बक्षिसे प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते तिला देण्यात आले.या यशस्वी विद्यार्थिनीस कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे,सुधीर तांबे,वर्गशिक्षक शिवनाथ हुजरे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी पर्यवेक्षिका माधुरी थेटे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment