समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना मुंबईची सफर

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी अनाथ मुलांसोबत साजरा केला वाढदिवस

विविध उपक्रमांची सुरवात करत, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा

कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाला नवी उभारी देऊ - समीर भुजबळ
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील व मुंबईबाहेरील अनेक अनाथ मुलांना मुंबईची सफर घडवण्यात आली त्याचबरोबर या मुलांच्या उपस्थितीत समीर भुजबळ यांनी आपला वाढदिवस साजरा करून या मुलांना शैक्षणिक साहित्य व विविध वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले. 


समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबईसह महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच समीर भुजबळ यांनी आपला वाढदिवस मुंबईत साजरा केला. पक्षाला मुंबईत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी समीर भुजबळ मैदानात उतरले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच पक्षातील मान्यवरांची उपस्थिती होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विभागातील कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती लक्षणीय होती. 
आगामी काळात याच कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही पक्ष संघटना मुंबईत मजबूत करण्याचे काम करू, ही कार्यकर्त्यांची उपस्थिती पक्षाला नक्कीच नवी उभारी देईल अशी भावना देखील समीर भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला