नाशिक शहरामध्ये राबविणार सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, यांचे नागरिकांना मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन

नाशिक :- राष्ट्रिय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नाशिक महानगरपालिका क्षयरोग विभाग यांचे वतीने संयुक्त क्षयरुग्ण शोध मोहीम अभियान दि.३ आक्टोबर ते १३ आक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये अतिजोखमीच्या भागात राबविण्यात येणार आहे. तरी या मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरी येणाऱ्या पथकास घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन क्षयरोग विभाग, नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.या मोहिमेकरिता १०० पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे शहरातील विविध भागांमधील ४९१३७ घरांना भेटी देऊन २२६२५६ लाख लोकसंख्येची या पथकांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन पथकातील आशा स्वयंसेवीकांमार्फत करून या संशयीत क्षयरुणांची मोफत थुंकी, मोफत एक्स-रे तपासणी नजीकच्या महानगरपालिका दवाखान्यात करण्यात येणार आहे. यामधून क्षयरोगाचे निदान झालेल्या क्षयरुणांना त्वरीत मोफत औषधोपचार सुरू करण्यात येतील तसेच निदान झालेल्या क्षयरुणांना केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा ५००/- रु निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी देण्यात येतात.
या मोहिमेसाठी शहरातील नाशिक, मध्य नाशिक, सातपुर, नाशिक रोड, सिडको या पाच क्षयरोग पथकांतर्गत येणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रस्तरावर आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे पथक घरो घरी जाऊन भेटी दरम्यान क्षयरोगाविषयी माहिती तसेच मार्गदर्शन करणार आहेत. या मोहिमेदरम्यान प्रत्येक तपासणी झालेल्या घरावर एल अक्षर, क्रमांक व तारीख नोंदविण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात निदान, उपचार सुविधा पुरविण्यात येणार आहेत तसेच प्रधाममंत्री टीबी मुक्त कार्यक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, ( निक्षय मित्र) यांचेमार्फत क्षयरुग्णांना मोफत शिधा वाटप करण्यात येते यासाठी देखील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण यांनी केले आहे.क्षयरोगाची लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला
वजनात लक्षणीय घट होणे भूक मंदावणे मानेवर गाठी येणे थुंकीद्वारे रक्त पडणे

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला