प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समाज कल्याण अधिका-यांना निवेदन
दिव्यांगांच्या निधी संदर्भात चौकशी ची मागणी
नाशिक :- नाशिक राखीव दिव्यांग नीधी खर्च करताना अनियमितता असल्याचे दिव्यांगांचे तक्रारी असल्याने प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले, सन २०२१,२०२२,व २०२३ या आर्थिक वर्षातील दिव्यांग निधी गटविकास अधिकारी यांनी खर्च करताना अनियमितता असुन मोजक्याच दिव्यांगांना लाभ मिळाला आहे, मुळ दिव्यांग अद्याप ही वंचित असल्याच्या तक्रारी संघटने कडे प्राप्त झाल्यानंतर, संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जिल्हा रुग्णालया कडून प्राप्त झालेले दिव्यांग प्रमाणपत्र १ वर्षे उलटून ही ग्रामसेवकांनी वाटप न केल्याने दिव्यांगांना योजनेच्या लाभास मुकावे लागत आहे, दिव्यांग हक्क अधिनियम नुसार दिरंगाई करणा-या संबंधितांवर कारवाई ची मागणीही यावेळी करण्यात आली या प्रसंगी
प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार, कार्याध्यक्ष बबलु मिर्झा, उपजिल्हाप्रमुख दत्ता कांगणे,उपजिल्हाप्रमुख रुपेश परदेशी जिल्हा सचिव नितीन गव्हाणे पाटील, सिन्नर तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे नाशिक शहराध्यक्ष सुभाष निकाळजे शहरसरचिणीस लक्षण पवार उपतालुकाप्रमुख संदिप आव्हाड उपतालुकाप्रमुख विलास कानकट, शहरसचिव पंकज सुर्यवंशी, भगुर शहराध्यक्ष कल्पेश करंजकर, राजु शेख नामदेव आडके भगवान पगार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment