आम आदमी पार्टीकडून गांधी जयंतीनिमित्त "स्वच्छ्ता हीच सेवा" उपक्रम
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे
आपच्या वतीने स्वच्छता मोहीम नाशिक :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने “स्वच्छता हीच सेवा” हा उपक्रम शहरांतील निमानी सिटी बस स्थानक येथे राबविण्यात आला.
"एक तास” स्वच्छतेसाठी देवून श्रमदानातून आप च्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या जीवनात स्वच्छता अनन्यसाधारण आहे याचे महत्त्व जनतेला समजावून सांगितले, महात्मा गांधी यांच्या 145 व्या जयंती निमित्त स्वच्छ्ता अभियानास प्रारंभ करण्यात आला होता. यावेळी राज्य मीडिया प्रमूख चंदन पवार, देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीश उगले पाटील, पुर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे आणि पदाधिकारी स्वप्निल घिया, अमर गांगुर्डे, प्रदीप लोखंडे, दीपक सरोदे, चंद्रशेखर महानुभव, मेघराज भोसले, कलविंदर गरेवाल, अमित यादव आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment