नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझी माती माझा देश अभियान
नाशिक :- नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त " माझी माती माझा देश " या अभियाना अंतर्गत उद्या बुधवार दि.११/१०/२०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता अमृत कलश प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझी माती माझा देश या उपक्रमा अंतर्गत नाशिक महापालिकेच्या सर्व ६ विभागीय कार्यालय व मनपा शाळा अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व विभागातील व शाळांमधील अमृत कलश संकलित करून उद्या मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या उपक्रमांत अनेक संस्थांनी सहभाग नोंदवला आहे त्यांनी त्यांचा कळश या कार्यक्रमात सुपूर्द करावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम बुधवार दि.११/१०/२०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे.या कार्यक्रमास सर्व नाशिककर, मनपा अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनपा पर्यावरण उपायुक्त तथा माझी माती माझा देश या उपक्रमाचे समनव्ययक डॉ.विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment