नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती धोके निवारण दिन साजरा
नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती धोके निवारण दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त प्रतिज्ञा घेणेत आली.
शासनाने निर्देशित केले नुसार दि.१३ ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विषयक सविस्तर माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय बैरागी यांनी विशद केली. तसेच मोहम्मद मुद्दसर यांनी आपत्ती धोके निवारण दिना विषयी माहिती दिली.आपत्ती प्रतिसादासाठी कटीबद्ध होण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेणे बाबत महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्यानुसार यावेळी प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे,नितीन नेर,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय बैरागी,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना कुटे, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, मोहम्मद मुद्दसर,सहाय्यक आयुक्त जवाहरलाल टिळे,साहाय्यक नगरसचिव किशोर कोठावळे शेखर चौरे,वाल्मिक ठाकरे,संतोष कान्हे,मनोज धामणे,संजय पटेल,राजू वर्मा,मंगेश नवले,संतोष वाघ,विशाल नवले,बाळासाहेब डांगळे,नितीन गंभीरे,सोनल पवार,हुसेन पठाण, सागर पिठे,वीरसिंग कामे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.प्रतिज्ञा वाचन व आपत्ती धोके निवारण दिनाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.
Comments
Post a Comment