आर्ट रबर अंबड कंपनीतील कंत्राटी कामगार कायम
नाशिक :- आर्ट रबर अंबड कंपनीतील कंत्राटी कामगारांना कायम करण्यात आले याबाबतचे पत्र वाटप सिटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ डी.एल.कराड.यांच्यासह कंपनी व्यवस्थापनाच्या उपस्थितीमध्ये कामगारांना देण्यात आले.
अंबड औद्योगिक वसाहत येथील आर्ट रबर कंपनीतील सुमारे २० कंत्राटी कामगारांना सिटु संघटनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाची चर्चा करण्यात आली कामगारांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला व आज कामगारांना कायम केल्याचे पत्र वाटप करण्यात आले. यावेळी कंपनी डायरेक्टर संजीव कुलकर्णी, एच.आर.हेड आशीष चव्हाण ,सिटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ डॉ. डी.एल.कराड, सिटुचे जिल्हाध्यक्ष कॉ.सीताराम ठोंबरे,जिल्हा सरचिटणीस कॉ.देविदास आडोळे,युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ.तुकाराम सोनजे,कॉ.अरविंद शहापुरे, कॉ.संतोष कुलकर्णी,कॉ.आत्माराम डावरे व कमेटी मेंबर कॉ. भीमराव गवळी ,कॉ.माधव आहेर,कॉ.भालचंद्र दाते,कॉ.संदेश पवार, कॉ.सुनिल उगले, कॉ.राकेश बराटे आदींसह कामगार उपस्थित होते.
Comments
Post a Comment