सेवानिवृत्त नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार
नाशिक :- नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सेवापूर्ती सत्कार समाज कल्याण उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतून ऑक्टोबर महिन्यात सहाय्यक लेखापरीक्षक सुनील खाडे,कनिष्ठ लिपिक निशांत सावंत, हेडनर्स आशा कापडणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञान छाया भामरे,सफाई कर्मचारी ललिता कानडे,सकट मार्तंड,सुनीता सौदे, विष्णू बेंडकुळे आदी सेवानिवृत्त झाले.
ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार समाज कल्याण उपायुक्त प्रशांत पाटील यांनी केला. यावेळी पुढील आयुष्यातील वाटचालीस सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले. या कार्यक्रमास महेश आटवणे,सोमनाथ कासार,राजश्री जैन आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment