युवासेनेचे नाशिक पुणे रोडवरील खड्यांच्या विरोधात अभिनव आंदोलन
ना.रोड :- नाशिक पुणे रोडवरील खड्यांच्या विरोधात युवासेनेचे वतीने आंदोलन महामार्गावर खड्ड्यांमुळे होणारे अपघात वाहतूक कोंडी गाड्यांचे नुकसान आदींसह समस्या प्रश्नी अभिनव पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला, याप्रसंगी युवासेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिरसाठ दिपक जाधव,योगिता गायकवाड युवा सेना उपजिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले येत्या काही दिवसांत सदरील खड्डे बुजवून डांबरीकरण न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी बाळकृष्ण शिरसाठ,आकाश उगले, कल्पेश पिंगले,महेश मते, माधुरी पाटील, दिपाली खैरनार, श्वेता सोनवणे, प्रतिभा देशमुख,स्वाती पाटील, सुवर्णा काळुंगे,दिपक ठाणगे,प्रसाद सोनवणे, ललित पानगव्हाणे, योगीराज निकम,राजन गायकवाड, अनिकेत खंडताळे, सुजित चव्हाणके, सुदर्शन चंदनानी, निलेश देशमुख निखिल गुंजाळ,शुभम गायकवाड,सौरभ ठाकरे,अतिश गोसावी आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवासैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment