मनपाच्या वतीने एकूण १४ केसेस करण्यात येऊन र.रु. ७५००० इतका दंड वसूल करण्यात आला
नाशिक :- सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून सप्टेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी मोहिमेच्या अनुषंगाने दर महिन्याला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार ऑक्टोंबर २०२३ करिता शहरातील विविध क्षेत्रांसाठी एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेच्या अनुषंगाने वेळापत्रक तयार करून दिले आहेत व त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाना तपासणी करण्याबाबत कळविले आहे.
दिवस दिनांक एकल वापर वस्तूंसाठी (sup) वस्तूंसाठी केंद्रबिंदू क्षेत्र
पहिला १७/१०/२०२३ रस्त्यावरील विक्रेते ,फुल विक्रेते ,स्थानिक बाजारपेठा, भाजीपाला मंडई ,दुकाने
दुसरा १८/१०/२०२३ रेल्वे स्थानक ,विमानतळ ,बस स्थानक ,घाऊक बाजारपेठ ,शॉपिंग मॉल ,हॉटेल्स
तिसरा १९/१०/२०२३ औद्योगिक क्षेत्र
चौथा २०/१०/२०२३ आंतरराज्य सीमांवर तपासणी करणे
सदर उपरोक्त शासन निर्देशाप्रमाणे मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या आदेशाने व घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक १७/१०/२०२३ रोजी शहरातील रस्त्यावरील विक्रेते ,फुल विक्रेते ,स्थानिक बाजारपेठा, भाजीपाला मंडई ,दुकाने आदी ठिकाणी सिंगल युज प्लास्टिक वापराबाबत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येऊन प्रथम गुन्ह्यासाठी एकूण १३ केसेस करण्यात येऊन एकूण ६५००० इतका दंड वसूल करण्यात आला तसेच सिंगल युज प्लास्टिक वापराबाबत दुसऱ्या गुन्ह्यात १ केस करण्यात येउन एकूण १०००० इतका दंड वसूल करण्यात आला.
Comments
Post a Comment